बहुगुणी, समाजमनाची जाण असलेले लोकप्रिय व्यक्तीमत्व म्हणजे मंञालयातील कार्यालय अधिक्षक सुनिलजी खाडे..
लोकहित न्यूज,मुंबई
लेखक नितीन जाधव . मंञालय मुख्य संपर्कप्रमुख
महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघ,मुंबई , दि.23 डिसेंबर 2020
मंञालयातील माहिती व जनसंपर्क विभागात 1995 पासून कार्यरत असणारे बार्शी चे सुनिल खाडे सामाजिक ,सांस्कृतिक ,शासकीय,सहकारी ,बँकींग क्षेत्रांत नेहमीच अग्रेसर राहीले आहेत. दि महाराष्ट्र मंञालय अँड अलाईड आॕफीसेस को.आॕ.बँक लि. मंञालय या बँकेच्या निवडणुकीत सुनिल खाडे बहुमताने निवडून येत संचालक पदी विराजमान झाले आहेत. मंञालयीन कामात त्यांनी उत्कृष्ट कार्याची छाप सोडली आहे .
मंञालयातील सर्वच विभागातील अधिकारी वर्गात त्यांचे मैञीपूर्ण संबंध असून मराठवाडा तसेच विदर्भ ,पश्चिम महाराष्ट्रातील जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यात ही ते आघाडीवर असतात.त्यामुळेच सुनिल खाडे सारखा बहुगुणी ,सोज्वळ दिलदार मनाचा कार्यकुशल अधिकारी प्रत्येक तालुका जिल्हास्तरावर असावा असेच त्यांना भेटल्यावर आपणास वाटते.ते नवी मुंबईस वास्तव्यास असून संत वामनभाऊ व भगवान बाबा मंडळा मार्फत अनेक सामाजिक कार्ये करत असतात व अनेकांना मदतीचा हात देण्यात आग्रही असतात.निरपेक्ष भावनेने कार्य करणारा तळमळीचा ,जीवाभावाचा समाजसेवक म्हणून ही ते अधिकारी वर्गात परिचित आहेत.
त्यांची काम करण्याची पध्दत सरळ साधी सुटसुटीत असल्यामुळे ते आपलेसे वाटतात .
राजकीय मंडळी , तसेच पञकार बांधवांसोबत ही त्यांची जवळीक व सलोखा मैञीपूर्ण संबंध असल्यामुळे कार्यक्षम अधिकारी म्हणून राज्यात सर्व दूर ओळखले जातात.
विशेष म्हणजे आज सुनील खाडे यांचा वाढदिवस आहे .त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने निरोगी दिर्घायुष्य लाभो त्यांची भरभराट व्हावी हीच सदिच्छा..