महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सतत च्या पाठपुराव्याला यश आता पत्रकाराला धमकाविल्यास तीन वर्षाचा तुरुंगवास

चालू घडामोडी देश/विदेश मुंबई राजकीय
Share now
Advertisement

लोकहित न्यूज मुंबई विशेष प्रतिनिधी दि 10/10/2022

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सततच्या पाठपुराव्याला यश आता पत्रकाराला धमकाविल्यास तीन वर्षाचा तुरुंगवास, सरकारचे आभार.

राज्यासह देशभरांमध्ये पत्रकारांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या संदर्भात उच्च न्यायालयाने सरकार वरती ताशेरे ओढत नाराजीची भावना व्यक्त केली होती. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने महाराष्ट्र सह देशभरामध्ये पत्रकारांना न्याय मिळावा या संदर्भात विविध माध्यमातून सरकार दरबारी आवाज उठविला होता. तसेच पत्रकारांना येणाऱ्या धमक्या व बातम्या प्रसार प्रसिद्धी मध्ये हस्तक्षेप करत होणारी अडवणूक गळचेपी संदर्भात देशाचे प्रधानमंत्री कार्यालया सोबत तसेच राज्यातील मुख्यमंत्री कार्यालया सोबत वेळोवेळी संवाद साधत पत्रकारांच्या वरील वाढते अत्याचार अन्याय संदर्भात न्याय देण्याची भूमिका मांडली होती. त्यास पंतप्रधान कार्यालय तसेच देशातील सर्व राज्यांच्या प्रमुख कार्यालयातून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला आहे. आता पत्रकारांवर हल्ला करणे व त्यांना धमकाविल्यास 50 हजार रुपयांचा दंड तसेच तीन वर्षाचा तुरुंगवास होणार असून सदरच्या घटनेतील गुन्हेगारास सहजासहजी जामीन मिळणार नाही.

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून कार्यरत असलेल्या पत्रकार,वार्ताहर संदर्भात देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांनी हा निर्णायक व महत्वपूर्ण निर्णय घेतल्यामुळे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे प्रदेशाध्यक्ष वसंतजी मुंडे ,प्रदेश मुख्य संघटक संजयजी भोकरे, प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथजी जाधव , मंत्रालय मुख्य संपर्क प्रमुख नितीनजी जाधव यांनी महाराष्ट्राबरोबर संपूर्ण देशातील पत्रकारांच्या वतीने सरकारचे जाहीर आभार मानले आहेत.
केंद्र सरकार व राज्य सरकारचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *