निकाला नंतर माझा बाप आठवल्याशिवार राहणार नाही -रोहित पाटील यांनी करुन दाखवले ,कवठेमहांकाळ नगरपंचायतीवर राष्ट्रवादी ची एक हाती सत्ता. आता म्हणतायत आबा मिस यू…

चालू घडामोडी महाराष्ट्र राजकीय
Share now
Advertisement

लोकहित न्यूज ,कवठेमहांकाळ दि.19/01/2022

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पाटील यांनी अखेर करुन दाखवलं आहे. राष्ट्रवादीने कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत विरोधकांचा धुरळा उडवला.

रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनेलने 10 जागांवर विजय मिळवून एकहाती सत्ता स्थापन केली. विरोधी शेतकरी विकास पॅनलल 6 जागांवर समाधान मानावं लागलं. रोहित पाटील यांनी प्रचारादरम्यान विरोधकांवर तुफानी हल्ला चढवला होता. निकालानंतर तुम्हाला माझा बाप अर्थात आर आर आबांची आठवण होईल, असा इशारा त्यांनी दिला होता. रोहित पाटील यांची प्रचाराची भाषणं चांगलीच गाजली होती. रोहित पाटील यांनी जे बोलले होते, ते करुन दाखवल्याचं चित्र सांगलीतील कवठेमहांकाळमध्ये आहे.

 निकालानंतर माझा बाप आठवल्या शिवाय राहणार नाही, असं रोहित पाटील म्हणाले होते. आता निकालानंतर रोहित पाटील यांनी बोलताना प्रसार माध्यमाला प्रतिक्रिया दिली. रोहित पाटील म्हणाले, निवडणुकीत विरोधकांनी माझा बाप काढला होता. मला बालिश ठरवलं, माझ्या बापाची पुण्याई म्हणाले, पण आता त्यांना माझ्या वडिलांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही” 

निकाल

शेतकरी विकास पॅनल 6 जागी विजयी

रोहित पाटील यांचे राष्ट्रवादी पॅनेल  10 जागी विजयी

अपक्ष 1 जागा विजयी..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *