मुक्तांगणकर्ते,जेष्ठ लेखक ,व्यसनमुक्तीचे जणक डाॕ.अनिल अवचट(बाबा) यांचे पुण्यात निधन

चालू घडामोडी महाराष्ट्र सामाजिक
Share now
Advertisement

जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते ,वैधकशास्ञाचे तज्ञ, जेष्ठ लेखक,अभ्यासू पञकार डाॕ.अनिल अवचट यांनी वयाच्या 77 वर्षी पुण्यात अखेरचा श्वास घेतला

लोकहित न्यूज ,पुणे दि.27/01/2022

मुक्तांगणकर्ते व्यसनमुक्तीचे जणक डाॕ .अनिल अवचट(बाबा) यांचे पुण्यात निधन.

आज 27 जानेवारी रोजी सकाळी सव्वा नऊ वाजता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, प्रसिद्ध लेखक डॉ. अनिल अवचट यांचे निधन झाले.

मराठी पत्रकारितेला डॉ. अनिल अवचट उर्फ बाबा यांनी रिपोर्ताज या महत्त्वपूर्ण प्रकाराची नव्याने ओळख करून दिली. त्यांनी लिहलेल्या लिखाणाचे पडसाद समाजमानसावर उमटून अनेक आंदोलने, चळवळी उभ्या राहिल्या. पत्रकारितेबरोबरच सामाजिक कामात तसेच अनेक कलांच्या क्षेत्रात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे.

[व्यसनमुक्तीवर त्यांनी खूप मोठे कार्य उभे केले.डॉ अनिल अवचट यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत.
पत्रकार नगरात दुपारी दोन पर्यंत पार्थिवाचं अंत्यदर्शन ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

मुक्तांगण च्या माध्यमातून व्यसनाधीनता दूर करण्यासाठी त्यांनी खूप मोठा लढा उभारला होता. राहत्या घरी दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले. त्यांना लोकहित न्यूज परिवाराच्यावतीने भावपूर्ण आदरांजली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *