राज्य पत्रकार संघाची राज्यस्तरीय आढावा बैठक शिर्डी येथे संपन्न होणार – प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे

चालू घडामोडी महाराष्ट्र सामाजिक सांस्कृतिक
Share now
Advertisement

लोकहित न्यूज, मुंबई दि 26/02/2023

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची राज्यस्तरीय आढावा बैठक शिर्डी येथे संपन्न होणार- सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे.

राज्यस्तरीय बैठकीचे प्रसिद्धीपत्रक

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची राज्यस्तरीय आढावा बैठक 10 मार्च रोजी शिर्डी येथे संपन्न होणार आहे.
यासंबंधीचे सविस्तर पत्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी जारी केले आहे.महाराष्ट्र राज्यातील पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष,तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांनी वर्षभराच्या कार्यकाळातील आपला कार्य अहवाल राज्य बैठकीसमोर सादर करण्याचे आवाहन केले आहे. सदरच्या बैठकीला संघाचे प्रदेश संघटक व मार्गदर्शक संजयजी भोकरे व प्रदेशाध्यक्ष वसंतरावजी मुंडे उपस्थित राहणार आहेत. या वार्षिक महत्त्वाच्या बैठकीमध्ये मुख्य पदाधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली जाणार असून संघटन वाढीसाठी तसेच इतर महत्त्वाच्या बाबी संबंधी पुढील नियोजन ठरणार आहे.

राज्य संघाची राज्यस्तरीय आढावा बैठक महत्त्वाची असून सदरच्या बैठकीस राज्यभरातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतरावजी मुंडे, राज्य संघटक संजयजी भोकरे, प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासरावजी आरोटे, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव, मंत्रालय मुख्य संपर्कप्रमुख नितीन जाधव, मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी, कोकण विभागीय अध्यक्ष नितीन शिंदे , विदर्भ विभागीय अध्यक्ष महेश पानसे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नितीन शिंदे, वृत्तवाहिनी संघाचे प्रदेश उपाध्यक्ष विजयकुमार कुलदीपके यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *