नितीन जाधव ,राजकीय विश्लेषक ,लोकहित न्यूज मंञालय,मुंबई
महाविकास आघाडी तील क्रियाशील ,समाजप्रिय ,नेतृत्व संपन्न कार्यकर्त्यांना येणार सोन्याचे दिवस जरा धीर धरा..
मुंबई दि. 29/06/2021
महाविकास आघाडी ला पाहता पाहता दोन वर्षे होत आली आहेत .अनेक संकटा बरोबर कोरोनाचा सामना करुन सुध्दा सरकार व्यवस्थित कार्य करत आहे .अशातच सध्या सरकार मध्ये मतभेद आहेत नाराजीनाट्य असल्याचे विरोधकाकडून वारंवार सांगितले जाते पण तसे काय नसल्याचे स्पष्ट आहे.आता महत्त्वाच्या महापालीका तसेच काही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका येऊ घातल्या आहेत त्यामुळे तीन्ही ही पक्षाकडून पक्ष ताकद वाढविण्याचे प्रयत्न होत आहेत.
आज शरद पवार व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची तब्बल एक तास महाविकास आघाडीतील अनेक विषयावर चर्चा झाली त्यात महत्त्वाचा विषय होता महामंडळाचे वाटप ..सरकारला जवळपास दोन वर्षे पूर्ण होत आहेत आता पक्षातील वंचित ,सक्रिय सेवा देणार्या कार्यकर्त्यांना महामंडळाच्या माध्यमातून सत्तेच्या प्रवाहात आणणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे.त्यामुळे महाविकास आघाडीतील शिवसेना ,राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांना सोन्याचे दिवस येणार हे निश्चित झाले आहे.यात सर्वसमावेशक रचना असणार आहे म्हणजे ज्यांना मंञीपद मिळाले नाही आहे असे काही नाराज मंडळी तसेच विधानसभेतील पराभूत उमेदवार असतील त्याच बरोबर पक्ष वाढीसाठी तळागाळात निस्वार्थीपणे कार्य करणारे क्रियाशील कार्यकर्ते यांचा समावेश महामंडळावर असणार .त्यात प्रामुख्याने नवख्या व प्रसिद्धी पासून दूर असणाऱ्या जनसेवकाला संधी मिळण्याचे संकेत दिसत आहेत.
विरोधकाकडून कितीही सरकार पाडण्याचे प्रयत्न झाले अथवा सरकाराला कोणत्याही मुद्यावर घेरण्याचा प्रयत्न झाला तर तो फोल ठरणार आहे महाआघाडी सरकार पाच वर्ष कार्यकाल पूर्ण करेल असे तत्वनिष्ठ नियोजन, आघाडीच्या समन्वय समिती ने आखले आहे.त्याच बरोबर जुलै मध्ये होणाऱ्या पावसाळी अधिवेशना संबंधी सर्व रणनिती तयार असल्याचे बोलले जात आहे .
येत्या महिनाभरात महामंडळाचे वाटप होत असल्यामुळे आघाडीतील कार्यकर्त्यांना तसेच पक्षाच्या आगामी भूमिकेला बळ मिळणार आहे तसेच महापालीका निवडणूकीत महाआघाडी ला फायदा होणार असल्याचे मत स्पष्ट होत आहे.
सरकार स्थापन झाले नंतर अवघ्या काही महिन्यात सबंध राज्य तसेच देशभर कोरोनाचे संकट तीव्र झाले अशात महाआघाडी सरकार ने व उध्दव ठाकरे यांनी राज्याचा मुख्यमंञी म्हणून केलेल्या कार्याचा देशभर जयजयकार झाल्याचे दिसले खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मुख्यमंत्री यांच्या कार्याचे निर्णायक भूमिकेचे कौतुक केले.
सध्या सरकार समोर अनेक आव्हाने आहेत कोरोना संकट,बेरोजगारी, आरक्षण, महागाई ,शेतीप्रश्न ,आजारी उद्योग ,कमी होत असलेली उत्पादन क्षमता आदी .मिळालेल्या खाञीलायक माहीतीनुसार सरकार सदरच्या सर्व आव्हानाचा नियोजनपूर्वक सामना करण्यास सज्ज आहे त्यामुळे सरकारला धोका नाही.
महाविकास आघाडीतील समन्वय समिती ने स्पष्ट केले आहे की, तीन्ही पक्षाचे विचार ,कार्यप्रणाली भिन्न आहे तसेच वैयक्तिक मंञी म्हणून प्रत्येकाची कार्यशैली वेगळी आहे त्यातून आपल्या खात्या संबंधी तसेच पक्षाच्या कामाविषयी वक्तव्य येत असतात कधी कधी नाराजी असते माञ सरकार म्हणून आम्हा सर्वाचा समन्वय अतिशय उत्तम आहे त्यात कधीच बदल होत नसतो .
महाआघाडी सरकार स्थीर ठेवण्या मागे समन्वय समिती महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. कोरोना संकटामुळे महामंडळाचे वाटप होण्यास विलंब झाला आता माञ जास्त वेळ न लावता महामंडळाचे वाटप होण्याचा मार्ग सुकर झाल्याचे आजच्या शरद पवार व उध्दव ठाकरे भेटीत स्पष्ट झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
तीन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी अनेक महिन्यापासुन आपली वर्णी मंडळावर लावण्यासाठी फिल्डींग लावायला सुरुवात केल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी व शिवसेनेत मुख्यत्वे नवख्या क्रियाशील नेतृत्वाला संधी मिळण्याचे संकेत आहेत त्यामुळे तळागाळातील निष्ठावान कार्यकर्त्यांना फळ मिळणार असून त्यांना सोन्याचे दिवस येणार असल्याची चर्चा मुंबईतील राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे.