ravsaheb danve news

दोन महीन्यात भाजपाचे सरकार दिसेल केंद्रीय मंञी रावसाहेब दानवे यांचा दावा.

महाराष्ट्र राजकीय

परभणी दि.23/11/2020:

राज्य सरकारमध्ये सहभागी असलेले नेतेगण भिन्न विचारांच्या पक्षातील असून नेत्यामध्ये प्रचंड बेबनाव निर्माण झाला आहे. कुणाचाच पायपुस, कार्यशैली कुणाला उमगत नाही. त्यामुळे हे सरकार येत्या दोन महिण्यात कोसळणार असल्याचे सांगत त्यानंतर भाजपचे सरकार राज्यात विराजमान होईल असा दावा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सोमवारी परभणीत केला आहे.

मराठवाडा पदवीधर मतदार संघातील भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्राचारार्थ सोमवारी येथील अक्षदा मंगल कार्यालयामध्ये जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेस विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर,आमदार मेघना बोर्डीकर, माजी आमदार मोहन फड, महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, अभय चाटे, माजी आमदार रामराव वडकुते, समीर दुधगावकर आदि मान्यवर उपस्थित होते.

रावसाहेब दानवे म्हणाले, मराठवाडा पदवीधर मतदार संघावर भाजपचा उमेदवार तीन वेळा निवडून आला आहे. (कै.) गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाचा उल्लेख करत त्यांनी त्यांच्या मुळेच हा मतदार संघ भाजपच्या ताब्यात राहिला. दोन वेळा जयसिंगराव गायकवाड व एक वेळा श्रीकांत जोशी यांनी मतदार संघाचे नेतृत्व केलेले आहे. त्यामुळे या मतदार संघात भाजपचा मतदार आहे हे सिध्द होते. परंतू गोपीनाथरावांच्या निधनानंतर हा मतदार संघ आपल्या हातून गेला असल्याचे सांगत त्यांनी परत तो मतदार संघ आता आपण ताब्यात घेतला पाहिजे असे आवाहन उपस्थितांना केले.

Share now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *