वाढदिवस विशेषलेख..
लोकहित न्यूज.. मुंबई. दि 21/02/2023
केवळ मुंबईच नव्हे तर दिल्ली दरबारी आपली स्वतःची छाप सोडणारा भाजप नेता म्हणजे सुजितसिंहजी ठाकूर …
माजी आमदार भाजपा प्रदेश सरचिटणीस सुजितसिंहजी ठाकूर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
वाढदिवस विशेष लेख
स्वतःची वेगळी अशी राजकीय संघटन कार्यप्रणाली व कार्यतत्पर अभ्यासू संवाद कौशल्यामुळे परंड्याच्या या भूमिपुत्राने महाराष्ट्र मुंबईच नव्हे तर दिल्ली दरबारी सुद्धा आपल्या कार्याची छाप सोडलेली आहे. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या तालमीत तयार झालेले सुजितसिंहजी हे राजबिंडे व्यक्तिमत्व मराठवाड्यातील सांस्कृतिक,सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहिलेले आहे.
पुणे मुंबई सारख्या ठिकाणी भाजपाचे कार्य करण्यासाठी भाजपाचा नगरसेवक. कार्यकर्ता शोधून सापडत नव्हता आशा काळात मराठवाड्यातील भूम-परंड्यासारख्या दुर्लक्षित आवर्षणग्रस्त पट्ट्यामध्ये भाजपची मुहूर्तमेढ रोवणारा संघर्षशील नेता म्हणून आज त्यांच्याकडे पाहिले जाते.
मुंबई प्रदेश भाजपाचे कार्यालय असो किंवा भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारणी मधील संघटन विषयक नियोजन असो सन्माननीय सुजितसिंह जी यांचा बोलबाला आपणास ऐकायला मिळतो. आपल्या कणखर, तजेलदार, खणखणीत आवाजामुळे व राजकीय कौशल्याची अद्भुत जाण असल्यामुळे
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी तसेच गृहमंत्री अमितजी शहा यांनी मागील विधानसभेच्या वेळी सुजितसिंह यांची आंध्र प्रदेश व तेलंगणा प्रदेशच्या मुख्य प्रचार प्रमुख पदाची धुरा हाती सुपूर्द केली होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी
फडणवीस सरकारच्या काळामध्ये विधान परिषदेचे आमदार व भाजपा प्रदेशचे सरचिटणीस म्हणून सुजितसिंहजी ठाकूर यांनी केलेल्या कार्याची दखल सर्व दूर घेतली गेली.
विधान परिषदेच्या सभागृहातील त्यांचे अभ्यासू भाषणे आजही अनेक ठिकाणी चर्चिली जातात. मतदार संघाच्या विकासासाठी स्वतःला वाहून घेणारा, आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याला नेत्याला जवळ करून विकासाच्या प्रवाहात आणणारा नव्हे तर मतदार संघातील प्रत्येक मतदार, कार्यकर्ता,जनता जनार्दनांच्या अडचणीं सोडवत त्यांना विकासाच्या प्रवाहात आणणारा क्रियाशील व दूरदृष्टी असलेला नेता म्हणजे सुजितसिंहजी ठाकूर आहेत.
महाराष्ट्राचे चाणक्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस जेव्हा मराठवाडा व धाराशिव जिल्ह्याच्या विकासाबाबत आजही जेव्हा भाष्य करतात तेव्हा सन्माननीय सुजितसिंहजी ठाकूर यांची भूमिका व मत अग्रस्थानी घेताना पहावयास मिळते.
सध्याचे राजकीय वातावरण पाहिले असता आपणास अनेक मतमतांतरे, धुर्त डावपेच, पक्षीय अंतर्गत खेळ, सूडबुद्धी, कपटीपणाची भावना सर्वत्र दिसते आहे. परंतु यातही ठाकूर यांनी ठाम विचाराची भूमिका, पक्षाविषयी एकनिष्ठ भावना, आपल्या कार्यकर्त्याला बळ देण्याची भावना, इतर पक्षातील नेत्यांबरोबर ही सलोख्याचे संबंध जोपासले व सर्व स्तरातील घटकांना राजकीय,शैक्षणिक, सामाजिक प्रवाहात आणून उत्तम स्थान देण्याची भूमिका सन्माननीय सुजितसिंह जी ठाकूर यांनी घेतलेली आहे.
मध्यंतरीच्या काळात सुजितसिंहजी ठाकूर आजाराने ग्रस्त झाले होते पण त्याही काळात ते आपले काम पार पाडत होते कार्यकर्त्यांना, जनसामान्यांना त्यावेळेसही मार्गदर्शन करताना आपल्याला दिसले. सध्या सुजितसिंहजी ठाकूर यांची प्रकृती उत्तम असून ते ठणठणीत आहेत. आपल्या पक्षीय संघटनेचे कार्य जोरकसपणे करत आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील भूम परंडा सारख्या दुर्लक्षित भागांमधून येत कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना आमदार तसेच भाजपा सारख्या मोठ्या पक्षाचा प्रदेश सरचिटणीस पदी कार्य करत सन्माननीय सुजितसिंहजी ठाकूर यांनी नव्या राजकीय पिढीसमोर उत्तम आदर्श निर्माण करून ठेवला आहे.
पक्षाचे सरकार नसताना अतिशय संघर्षाच्या काळामध्ये सन्माननीय सुजितसिंहजींनी पक्षाची धुरा एक हाती सांभाळत मराठवाड्यामध्ये भाजपचा झंझावात कायम ठेवला होता यामुळेच त्यांच्या कार्याची दखल आज केवळ मुंबई नव्हे तर दिल्ली दरबारी सुद्धा घेतली जाते.
याच त्यांच्या संघर्षशील कार्यपद्धतीमुळे त्यांना जनसामान्यांचा नेता व संघर्ष योद्धा म्हणून संबोधले जाते.
सन्माननीय सुजितसिंहजी ठाकूर यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळेच त्यांच्या कार्याचा थोडक्यात मागोवा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे.
माजी आमदार तथा भाजप प्रदेश सरचिटणीस सुजितसिंहजी ठाकूर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
लेखक- नितीन जाधव.
राजकीय विश्लेषक .
मंत्रालय मुख्य संपर्क प्रमुख.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,मुंबई.