मराठा समाजाला आरक्षण न देता पदभरती आदेश तसेच शिक्षण प्रवेशासंबंधी चा आदेश शासनाने काढला असल्यामुळे मराठा समाज प्रचंड नाराज.
मुंबई प्रतिनिधी
मराठा समाजाला अंधारात ठेवून महावितरणे भरती चे परिपञक काढले आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी आणी ऊर्जा मंञी नितीन राऊत यांच्यावर मराठा समाजातील विविध संघटनेने रोष व्यक्त केला आहे.
मराठा समाज तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत असूनमराठा
बांधवांच्या भावनातीव्र आहेत.
शासनाने सांगितले आहे एसईबीसी चे आरक्षण न देता शैक्षणिक प्रवेश सुरु करावेत .
तसेच महावितरण भरतीत एसईबीसी प्रवर्ग वगळून पदभरती करण्यात यावी.
महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात सकल मराठी ठोक मोर्चा काय भूमिका घेणार हे माञ पाहणे औत्सुक्याचे असणार मराठा समाज आक्रमक होणार..
तर दुसरीकडे भरती सुरु होणार असल्यामुळे ओबीसी संघटनांनी केले शासनाचे कौतुक .
सदरच्या विषयावर मराठा म्हणवून घेणारे राजा मंडळी , मराठानेतेगण माञ गप्पच आहे.मराठा समाजाने तातडीने मुख्यमंत्री व शासनाकडे विनंती केल्याची माहीती लोकहित न्यूज ला मिळाली आहे.