स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त उरसळ कॉलेज तर्फे यशस्वीरित्या आरोग्य जनजागृती रील स्पर्धा आयोजन

चालू घडामोडी पुणे महाराष्ट्र शैक्षणिक सांस्कृतिक
Share now
Advertisement

स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त खराडी येथील फार्मसी महाविद्यालयातर्फे “राज्यस्तरीय आरोग्य जनजागृती रील स्पर्धेचे” यशस्वी आयोजन:

लोकहित न्यूज. पुणे 

पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे संस्थेच्या खराडी येथील शंकरराव उरसळ कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल सायन्स आणि रिसर्च सेंटर महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे भूतपूर्व अध्यक्ष स्वर्गीय श्री. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त ”राज्यस्तरीय आरोग्य जनजागृती रील” स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. सदरच्या स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरण समारंभाचा कार्यक्रम महाविद्यालयामध्ये उत्साहात संपन्न झाला. सदरच्या स्पर्धेचे आयोजन बी. फार्मसी व डी. फार्मसी स्तरावर करण्यात आलेले होते ज्यामध्ये विविध फार्मसी महाविद्यालयांमधून बी. फार्मसी स्तरातून 34 व डी. फार्मसी स्तरातून 28 अशा एकूण 62 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी औषधांचा गैरवापर, अँटिबायोटिक्सचा सुयोग्य वापर तसेच जीवनशैलीशी संबंधित विविध आजार या विषयांवर अभ्यासपूर्ण, समाजप्रबोधनात्मक व माहितीपूर्ण रील्स सादर करून आपले कौशल्य सिद्ध केले.
या कार्यक्रम प्रसंगी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अंतर्गत लेखा परीक्षक श्री. अशोक शर्मा तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे मा. सदस्य व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक भोसले यांच्या शुभहस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेमध्ये बी. फार्मसी स्तरातून प्रथम क्रमांक सुरज भोसले – राजश्री शाहू कॉलेज ऑफ फार्मसी, ताथवडे, पुणे , द्वितीय क्रमांक -मंदार दौंडकर, सौ. काशीबाई नवले कॉलेज ऑफ फार्मसी, कोंढवा, पुणे व तृतीय क्रमांक मृणाल शिंगारे- मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी, मोशी, पुणे या स्पर्धकांनी तर डी. फार्मसी स्तरातून प्रथम क्रमांक सुदर्शन कांबळे- जयवंतराव सावंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, हडपसर, पुणे , द्वितीय क्रमांक शिवम निकम -सातारा कॉलेज फार्मसी, देगाव, सातारा व तृतीय क्रमांक गौरव गुप्ता- भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, बेलापूर, मुंबई यांनी पटकाविला. सदरच्या यशस्वी विद्यार्थ्यांना महाविद्यालयातर्फे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे रक्कम रुपये ₹३,०००, ₹२,००० ₹१,००० तसेच ट्रॉफी, प्रमाणपत्रे इत्यादी देऊन गौरविण्यात आले.
सदरच्या बक्षीस वितरण कार्यक्रमामध्ये सुरुवातीला स्वर्गीय श्री. अजित दादा पवार यांच्या कार्यशैलीवरील तसेच जीवनपटावरील चित्रफितीचे सादरीकरण करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक भोसले यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित करताना सदरच्या आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय आरोग्य जनजागृती रील स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य विषयक जनजागृती, सामाजिक उत्तरदायित्व आणि आधुनिक माध्यमांचा प्रभावी वापर करून समाजप्रबोधन करण्याची प्रेरणा मिळत असल्याचे मत व्यक्त केले तसेच त्यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदनही केले.
विजेत्या विद्यार्थ्यांपैकी शिवम निकम तसेच मृणाल शिंगारे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना राज्यस्तरीय आरोग्य जनजागृती रील स्पर्धा आयोजित करणारे खराडी फार्मसी महाविद्यालय हे एकमेव महाविद्यालय असल्याचे सांगून त्यांनी महाविद्यालय व आयोजकांचे कौतुक केले. सदरच्या बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच विविध महाविद्यालयातील विजेते स्पर्धक इत्यादी उपस्थित होते.
सदरच्या राज्यस्तरीय आरोग्य जनजागृती स्पर्धेचे आयोजन करण्यास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक भोसले यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन फार्माकोग्नोसि विभागाचे विभाग प्रमुख व स्पर्धेचे समन्वयक प्रा. डॉ. विपुल धसाडे , प्रा.वृषाली रणदिवे तसेच प्रा. बिल्वदा बैचे यांनी केले.
सदरच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धेचे समन्वयक प्रा. डॉ विपुल धसाडे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. सौ तृप्ती शहा यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. रुचिता भालेराव यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *