धाराशिव जिल्हा विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी कटिबद्ध. भूम परंडा मतदारसंघ पायाभूत सुविधेसह सुजलाम सुफलाम बनवणार.
मंत्री डॉ. तानाजी सावंत. वाढदिवस विशेष लेख
लोकहित न्यूज. मुंबई दि 15/03/2023
धाराशिव जिल्ह्याचा खणखणीत आवाज राज्याचे लोकप्रिय आरोग्यमंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत यांचा आज वाढदिवस त्यानिमित्त त्यांच्या कार्यपद्धतीवर टाकलेला थोडक्यात प्रकाशझोत.
वाढदिवस विशेषलेख -लेखक नितीन जाधव
सन्माननीय मंत्री डॉ.तानाजी सावंत साहेबांसोबत जनसंपर्क अधिकारी पदी कार्यालयीन काम करत असताना त्यांची कार्यपद्धती व राजकीय विचार जवळून अनुभवता आले ते सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत.
प्राध्यापक, डॉक्टर,आमदार, मंत्री, जलदूत. शिक्षण महर्षी ,आरोग्यदूत.विकासरत्न ,मराठा सम्राट एवढ्याच उपाध्या देऊन त्यांच्या विषयी आपण लिहीत असतो बोलत असतो परंतु त्यांच्या राजकीय विकासात्मक संकल्पना ठरलेल्या आहेत.त्या कोणत्या?थोडक्यात उजाळा देण्याचा प्रयत्न करूयात.
मतदार संघातील प्रत्येक घरातील प्रत्येक शिक्षित तरुणाला स्वतःच्या तालुक्यात शहरातच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मोहीम राबवत आहेत.
शेतीमध्ये कोणत्या प्रकारची पिकं उत्पादित केल्यानंतर त्याला योग्य मोबदला उत्कृष्ट बाजारपेठ मिळेल यासाठी नियोजन सुरू.
धाराशिव जिल्ह्यात उद्योग व्यवसाय निर्माण व्हावेत यासाठी कोणत्या प्रकारचा उद्योग सुरू करता येईल त्यासाठी सातत्याने उद्योजकीय अभ्यास गटाशी चर्चा.
गावोगावी शेतीपूरक व्यवसायाच्या संबंधित प्रशिक्षण वर्ग निर्माण करण्याचे नियोजन,शेतीला जोडधंदा निर्माण करण्याचे धोरण.
मतदार संघातील गावोगावी पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर. सुसज्ज उत्तम रस्ते. पूर्णवेळ वीज. नळाद्वारे भरपूर पाणीपुरवठा. सांडपाणी व गटार लाईन व्यवस्थापन धोरण.
यशस्वी कारखानदारीच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विकासाच्या प्रवाहात आणले.. शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून गोरगरिबांच्या मुलांना अल्प दरात शिक्षण उपलब्ध केले.
शिवजल क्रांतीच्या माध्यमातून गावोगावी ओढा नदी नाले खोलीकरण रुंदीकरण सरळीकरण करून पाणी आडवा पाणी जिरवा प्रकल्प राबवले जमिनीतील पाण्याची पातळी वाढली.
शिवजल कांतीचा चौथा टप्प्याचा प्रयोग आणखी सुरू ठेवलाय.
खेड्यापाड्यातील लोकांचे आरोग्य सुधारणेवर भर देण्यात येत आहे.. प्राथमिक आरोग्य केंद्र. ग्रामीण रुग्णालय. उपजिल्हा रुग्णालय. जिल्हा रुग्णालय प्रत्यक्ष पाहणी करून सुसज्ज बनवण्यात येत आहे. प्रत्येकाला शासनाच्या आरोग्य सुविधेचा लाभ मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात.
त्यामुळेच त्यांच्या आरोग्य खात्याने राबवलेल्या माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियानाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. खुद्द पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांनीही या अभियानाचे कौतुक केले.
सरकारी योजना किंवा स्वतःच्या खात्यामार्फत जर एखादे काम होत नसेल तर स्वतःच्या मार्फत लाखो रुपये खर्च करून रुग्णांचे प्राण वाचवणारे व गोरगरिबांना शिक्षणात मदत करणारे महाराष्ट्रातील एकमेव दानशूर आमदार म्हणून प्रसिद्ध त्याचा प्रत्यय अनुभव महाराष्ट्रातील अनेक व्यक्तींना आलेला आहे.
स्वतःच्या जीवनामध्ये सर्वच क्षेत्रांमध्ये उत्तुंग अशी प्रगती केली असल्यामुळे राजकारणातून स्वतःसाठी कसलाच स्वार्थ जवळ बाळगलेला नाही, केवळ मतदार संघातील जनतेची प्रगती हाच मनी ध्यास घेतलेला आहे.
स्वतःचे संपूर्ण आयुष्य केवळ जनतेच्या कल्याणासाठी समर्पित करणार असून राजकारणातून केवळ समाजकारण व विकास करणार हेच ध्येय डॉक्टर सावंत यांनी मनी बाळगले आहे.
त्यांच्या बोलण्यात अभ्यासपूर्ण व यशस्वी खरा आक्रमकपणा असतो त्यामागे त्यांचा कसलाही स्वार्थ दडलेला नसतो परंतु काही विरोधक त्याचा फायदा उचलताना नेहमी दिसतात.
परंतु सन्माननीय मंत्री तानाजी सावंत यांचे कार्य अतिशय मोठ्या उंचीचे असल्यामुळे जनता जनार्दन सदैव त्यांच्या पाठीशी राहील व त्यांना विकासात्मक कार्य करण्याचे बळ देईल हीच अपेक्षा.
येणारा भविष्यकाळ सन्माननीय मंत्री तानाजीराव सावंत साहेब यांच्यासाठी अतिशय उज्वल असणार आहे तसेच धाराशिव जिल्हा व भूम परंडा मतदारसंघ त्यांच्या नियोजित यशस्वी योजना मार्फत मोठी प्रगती करेल हे निश्चित.
सन्माननीय मंत्री तानाजी सावंत यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांच्या कार्यपद्धतीवर थोडक्यात टाकलेला प्रकाश झोत. महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री प्राध्यापक डॉ. तानाजी सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
नितीन जाधव.
राजकीय विश्लेषक.
मंत्रालय मुख्य संपर्कप्रमुख.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ. मुंबई
मो 9326398001