लोकहित न्यूज,मुंबई विधान भवन दि 16/09/2022
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे मंत्रालय मुख्य संपर्कप्रमुख नितीन जाधव यांनी विधान भवन मुंबई येथे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते तथा शिवसेना नेते अंबादास जी दानवे यांची विधान भवन मुंबई येथे भेट घेतली यावेळी राजकीय. सामाजिक तसेच समाजातील वंचित घटक व पत्रकारांच्या विविध विषया संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांनी सांगितले,पत्रकारांचे प्रश्न तसेच समाजातील वंचित घटकांच्या न्याय हक्काचे प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मी सदैव आपल्या सोबत आहे. ग्रामीण शहरी वार्ताहर. बातमीदार, वेब पोर्टल संपादक, डिजिटल मीडिया प्रतिनिधी तसेच समाजातील विविध वंचित घटक यांच्या विषयांची सरकार दरबारी व्यवस्थितरित्या सोडवणूक होत नसेल तर शिवसेना पक्ष तसेच विरोधी पक्ष नेता म्हणून आपला राज्य मराठी पत्रकार संघाच्या तसेच लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून कार्यरत असलेल्या सबंध पत्रकारांच्या कार्यास कायमच पाठिंबा असणार आहे.
विधान भवन मुंबई येथील चर्चेदरम्यान पत्रकार संघाचे मंत्रालयीन मुख्य संपर्क प्रमुख नितीन जाधव यांनी राज्य मराठी पत्रकार संघाच्या कार्याचा अहवाल सादर केला.. वृत्तपत्र, वेब,डिजिटल मीडिया,इलेक्ट्रॉनिक मीडिया यामध्ये काम करणारे कर्मचारी. वार्ताहर पत्रकार. मीडिया प्रतिनिधी यांना नेहमीच तुटपुंज्या मानधनावर पत्रकार पदी कार्य करावे लागते तसेच कोरोना काळात अनेक वृत्तपत्राचे संपादक, मुख्य बातमीदार यांना वृत्तपत्राला जाहिरातीचा स्त्रोत मिळत नसल्याने नोकरी गमावून घरी बसावे लागले अनेक अडचणीचा सामना करावा लागला. वृत्तपत्र सृष्टी तसेच इलेक्ट्रॉनिक मीडिया यातील कर्मचारी तसेच पत्रकार प्रतिनिधी यांना कायमस्वरूपी अडचणीतून मुक्त करण्यासाठी वार्ताहर कल्याणकारी महामंडळाची स्थापना करण्यात यावी असे स्पष्ट मत जाधव यांनी बोलताना व्यक्त केले.
यावेळी अंबादासजी दानवे यांना वृत्तपत्रसृष्टी, वेब मिडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया मधील कार्यरत पत्रकारांना येणाऱ्या अडचणी संदर्भात सविस्तर माहिती दिली. या सबंध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी वार्ताहर कल्याणकारी मंडळ नक्कीच वरदान ठरेल असा विश्वास अंबादासजी दानवे यांनी व्यक्त केला. व पत्रकार संघ करत असलेल्या कार्यास पाठिंबा दर्शवला.