लोकहित न्यूज ,मुंबई दि.12/07/2021
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी राहत असलेली दक्षिण मुंबईतील ‘पृथ्वी अपार्टमेंट्स’ नावाची इमारत सील करण्यात आली आहे. सुनील शेट्टी राहत असलेल्या इमारतीमध्ये कोरोनाचे 5 रुग्ण आढळून आले आहेत, त्यामुळे मुंबई महापालिकेने इमारत सील करण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिकेचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की, ही इमारत दोन दिवसांपूर्वी सील केली आहे. सुनील शेट्टी मागील काही वर्षांपासून अल्टामाऊंट रोडवरील ‘पृथ्वी अपार्टमेंट’ मध्ये राहत आहे. त्याच्यासोबत पत्नी, मुलगी आणि मुलगा अहान शेट्टी हे देखील याच इमारतीत राहतात.
प्रशांत गायकवाड यांनी सुनील शेट्टी यांच्या परिवारातील कुठल्याही सदस्याला कोरोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. सुनील शेट्टीच्या प्रवक्त्यांनी देखील याला दुजोरा दिला आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात कुठल्याही इमारतीमध्ये पाचपेक्षा अधिक रुग्ण सापडल्यास इमारतीला मायक्रो कंटेन्मेंट झोन घोषित करुन इमारत सील केली जाते.