दुग्ध पदार्थ व्यवसायिकास कोयत्याने मारून गंभीर जखमी करून त्यांच्याकडील लॅपटॉप रोख रक्कम जबरदस्तीने लुटणारे आरोपींना कोंढवा तपास पथकाने केले जेरबंद

चालू घडामोडी महाराष्ट्र
Share now
Advertisement

लोकहित न्यूज,कोंढवा दि 18/04/2022


दुग्ध पदार्थ व्यवसायिकास कोयत्याने मारहाण करून गंभीर जखमी करून लॅपटॉप सह रोख रक्कम जबरदस्तीने लुटणारे आरोपी कोंढवा पोलिस स्टेशनच्या तपास पथकाने केले जेरबंद .

दिनांक 14/ 3 /2022 रोजी सायंकाळी साडेसात वाजता चे सुमारास पांडुरंग सदाशिव कुरणे वय 42 वर्षे फ्लॅट नंबर 202,श्रेया प्लाझा गणपती माथा मंदिर समोर वारजे माळवाडी, पुणे हे दिवसभराची व्यवसायाची 10000 रुपये रोख रक्कम व लॅपटॉप त्यांच्या बॅगमध्ये घेऊन त्यांच्या दुचाकीवरून जात होते. उंड्री पुणे येथील प्रिन्स टाऊन रॉयल सोसायटीचे समोर मोकळ्या जागेत फिर्यादी लघुशंका करिता थांबले असता अनोळखी 3 इसमांनी फिर्यादी यांना कोयत्याने मारून जखमी करून त्यांच्याकडील लॅपटॉप, 10000 रु रोख रक्कम,पॅन कार्ड, आधार कार्ड व बँकेची इतर कागदपत्रे बळजबरीने घेऊन त्यांच्या दुचाकी गाडीवरून पळून गेले म्हणून यातील फिर्यादी यांना सदर अनोळखी इसम आमच्या विरोधात तक्रार दिल्याने त्याबाबत कोंढवा पोलीस ठाणे पुणे गुरंनं 239 /2022 भादवि कलम 394 आर्म अक्ट कलम 4(25) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदरचा गुन्हा घडल्यानंतर सरदार पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गोकुळ राऊत पोलीस निरीक्षक( गुन्हे) व जगन्नाथ जानकर पोलीस निरीक्षक (गुन्हे) कोंढवा पोलिस ठाणे पुणे यांचे मार्गदर्शनाखाली कोंढवा तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील व तपास पथकातील अंमलदार यांनी तपास सुरू केला तपास पथकातील पोलीस अंमलदार किशोर वळे.पोलीस नाईक निलेश देसाई यांनी माहिती घेतली असता त्यांना समजले की पांडुरंग कुरणे यांच्याकडे इसम नामे आकाश सुर्यकांत पवार वय 24 वर्षे धंदा नोकरी राहणार वेताळ वस्ती कॅनल लगत सासवड रोड, हडपसर,पुणे हा नोकरीस होता त्याने पत्नीच्या उपचाराकरता फिर्यादी यांच्याकडे आगाऊ पगार मागितला होता परंतु फिर्यादी यांनी त्यास नकार दिल्याने आकाश सूर्यकांत पवार यांनी त्याचे साथीदार नामे मयूर उत्तम कांबळे वय 21 वर्षे धंदा भाजीविक्री राहणार सर्वे नंबर 79,गरुड वस्ती रास गे आळी. बापू हिंगणे चाळ,हडपसर गाव, पुणे.अविनाश नागनाथ सूर्यवंशी वय 22 वर्ष धंदा मजुरी राहणार निखिल जगताप यांच्या खोलीमध्ये हिंगणे मळा, हडपसर गाव, पुणे तसेच आदित्य सतीश कोरडे वय 20 वर्षे धंदा नोकरी, राहणार सातव वस्ती,राहुल कॉलनी, गोंधळेनगर हडपसर पुणे,यांच्यासह संगणमत करून फिर्यादी यांना लुटण्याचा कट केला होता

सदर चारही आरोपी हे मंतरवाडी फाटा हडपसर पुणे येथे येणार असल्याची माहिती तपास पथकातील पोलिस नाईक निलेश देसाई व पोलिस अंमलदार किशोर वळे यांना मिळाल्याने सदर ठिकाणी सापळा लावून चारही आरोपींना शिताफीने ताब्यात घेऊन सदरचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणून अति उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
वरील नमूद कारवाई ही सरदार पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन,पोलीस निरीक्षक( गुन्हे) जगन्नाथ जानकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे )गोकूळ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील, निलेश देसाई , ज्योतिबा पवार, तुषार आल्हाट, गोरखनाथ चिनके, सतीश चव्हाण, लक्ष्मण होळकर व किशोर वळे यांच्या पथकाने केली आहे
या कामगिरीबद्दल कोंढवा पोलिस ठाण्याच्या सर्व पथकाचे पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *