मुंबई प्रतिनिधी 28 नोव्हेंबर 2020
महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्ताने पोलीस बांधवासाठी महत्त्वपूर्ण घरांची योजना राबवण्यात येणार
राज्यातील महा विकास आघाडी सरकारला आज एक वर्ष पूर्ण झाले असून त्यानिमित्ताने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील पोलिसांना आनंदाची बातमी दिली आहे. पोलिसांच्या घराचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा असून त्यामुळे पुढील चार वर्षात पोलिसांसाठी एक लाख घरं बांधण्याची योजना लवकरात लवकर पूर्ण करू अस त्यांनी सांगितलं तसेच दिशा कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात शक्ती कायदा आणणार असून येत्या अधिवेशनात याचा मसुदा मांडला जाईल असेही ते म्हणाले .तसेच राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस दलात साडेबारा हजार जागा भरण्याचा ऐतिहासिक निर्णय आम्ही घेतला आहे त्याचबरोबर मराठा आरक्षणामुळे भरती प्रक्रिया रखडली परंतु कोणत्याही समाजावर अन्याय न करता पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येईल, महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात शक्ती कायदा आणण्याचे काम सुरू केलं पण कोरोनामुळे काम थांबलं होतं तसा ड्राफ्ट तयार झालेला असून येत्या अधिवेशनात हा मसुदा विधिमंडळात मांडून त्याला एकमताने मंजुरी मिळेल अशी अपेक्षा आहे .आरोपीला लवकरात लवकर शिक्षा मिळेल असा हा कायदा असेल अशी माहिती त्यांनी दिली आहे.
Post Views: 555