शिवसेना मध्यवर्ती कार्यालय बाळासाहेब भवन येथे गृहराज्यमंत्री योगेश कदम जनतेच्या भेटीला

चालू घडामोडी मंञालय मुंबई राजकीय शैक्षणिक सामाजिक
Share now
Advertisement

शिवसेना मध्यवर्ती कार्यालय बाळासाहेब भवन येथे गृह राज्यमंत्री योगेश कदम जनतेच्या भेटीला.

नितीन जाधव. बाळासाहेब भवन,मुंबई.दि 29//01/25

राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ भाई शिंदे यांच्या सूचनेनुसार पक्ष कार्यालयात जनसंवाद सुरू करण्यात आला आहे.
आज बुधवारी दुपारच्या सत्रामध्ये राज्यमंत्री योगेश कदम ( गृह शहरे, ग्रामविकास,महसूल, अन्न नागरी ग्राहक संरक्षण व अन्न व औषध प्रशासन ) जनतेच्या भेटीला आले होते यावेळी त्यांनी सर्वांसोबत जनसंवाद साधला.
शिवसेना पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालया मध्ये राज्यभरातील नागरिक, पक्ष कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी अर्ज व निवेदन देत मंत्री महोदयांसोबत थेट चर्चा केली यावेळी मंत्री महोदयांनी जनतेचे प्रश्न,अडचणी जाणून घेतल्या व समस्येचे निराकरण करण्यासाठी संबंधित खात्यास थेट संपर्क केला. त्यामुळे अनेक नागरिकांची कामे मार्गी लागल्याचे चित्र पहावयास मिळाले. सदरच्या जनसंवाद कार्यक्रमास नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.तसेच पुढील आठवड्यात होणाऱ्या जनसंवाद भेट कार्यक्रमात आत्ताच्या सर्व बाबींचा आढावा घेणार असल्याचे मंत्री कदम यांनी नागरिकांसोबत चर्चा करताना स्पष्ट सांगितले. जनसंवादामुळे सर्वसामान्य जनतेची कामे तात्काळ होत असल्याने त्याचा जनतेस फायदा होत आहे. सदर जनसंवाद प्रसंगी शिवसेना पक्षाचे प्रवक्ते अरुण सावंत व ज्येष्ठ शिवसेना पदाधिकारी मंत्री महोदया सोबत उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *