पत्रकारांचा जवळचा ‘ माहिती अधिकारी ‘ मिञ ’ हरपला राजेंद्र सरग (वय 54) यांचे पहाटे कोरोनाने निधन

चालू घडामोडी महाराष्ट्र
Share now
Advertisement

लोकहित न्यूज ,पुणे दि.3/04/2021

मनमिळावू अधिकारी,पञकारांचे जवळचे मिञ मार्गदर्शक,व्यंगचिञकार ,कर्तव्यदक्ष अधिकारी सरग साहेब काळाच्या पडद्या आड सर्व क्षेञातून हळहळ व्यक्त

पुणे  जिल्हा माहिती अधिकारी तथा माहिती व जनसंपर्क महासंचालनायाचे पुणे विभागाचे प्रभारी उपसंचालक राजेंद्र एकनाथ सरग (वय 54) यांचे आज पहाटे कोरोना विषाणूंच्या आजारामुळे ससून रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे पत्रकारिता आणि माध्यम क्षेत्रात तीव्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पत्रकारिता आणि माध्यम क्षेत्रात राजेंद्र सरग हे सुमारे 31 वर्षे प्रदीर्घ काळ कार्यरत होते. त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रवादीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांच्यासहीत अनेक प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी,  प्रसारमाध्यम क्षेत्रातील पत्रकार व सहकार्‍यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

राज्यातील हजारो पत्रकारांचा जिवलग मित्र, एक प्रसिद्ध व्यंगचित्रकार आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील एक कार्यक्षम अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती.    रविवारी  खोकला आणि ताप आल्याने त्यांनी कोरोनाची चाचणी केली असता ते कोविड पॉझिटिव्ह आढळले होते. त्यांच्या पत्नीचाही अहवाल पॉझिटिव्ह आलेला होता. राजेंद्र सरग यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार चालू होते.   मध्यरात्री त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.  उपचार सुरू असताना आज पहाटे त्यांना  अखेरचा श्वास घेतला.

राजेंद्र सरग यांनी जिल्हा माहिती अधिकारी म्हणून बीड, अहमदनगर, परभणी, पुणे अशा अनेक ठिकाणी काम केले आहे. राजेंद्र सरग यांना विविध विषयांवर व्यंगचित्र काढण्याचा छंद होता. ते अनेक वर्षांपासून काही दैनिक, साप्ताहिकांना  व महाराष्ट्रातील 150 ते 200 दिवाळी अंकांना मोफत व्यंगचित्र देत असत. 2017 साली त्यांची अहमदनगर येथून पुणे जिल्हा माहिती अधिकारी पदी बदली झाली होती. त्यापूर्वी त्यांनी परभणी आणि बीड येथे जिल्हा माहिती अधिकारी पदावर कार्य केलेले आहे. 9 मार्च 2014 ते 5 जून 2017 या कालावधीत सरग यांनी अहमदगनर जिल्हा माहिती अधिकारी पदावर कार्य केलेले आहे. सरग हे मूळचे नाशिक जिल्ह्यातील नांदगावचे होते. त्यांनी आपल्या करिअरच्या सुरूवातीच्या काळात औरंगाबादेतील देवगिरी तरूण भारत वृत्तपत्रातही काही काळ कार्य केले. नंतर ते स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन माहिती व जनसंपर्क विभागात रूजू झाले.

आठवड्यातच होणार होते प्रमोशन मंञालयातून कळवले होते ,संधी हुकली नियतीने हिरावून नेले.

उत्तम वार्तांकन कौशल्य , संगणकावर प्रभुत्व , व्यापक जनसंपर्क , हसतखेळत काम करण्याची वृत्ती आणि सतत कार्यरत राहण्यातच खरा आनंद असतो हे आपल्या आचरणातून दाखवणारे सरग चांगले व्यंगचित्रकार होते.

राजेंद्र सरग यांनी नवीन, जुना, लहान, मोठा पत्रकार असा कधीच भेदभाव केला नाही.प्रत्येकास सहकार्य केले. त्यांचे प्रशासकीय काम पाहून येत्या आठवड्यात त्यांचे प्रमोशन होणार असल्याचे त्यांना मंत्रालयातील माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने सांगण्यात आले होते.  लोकहित न्यूज च्या वतीने राजेंद्र सरग यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *