चिंचवड व कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर

चालू घडामोडी देश/विदेश पुणे मुंबई राजकीय
Share now
Advertisement

श्रीमती अश्विनी लक्ष्मण जगताप व श्री हेमंत रासने दोन्ही उमेदवार विजय संपादन करतील – मंत्री चंद्रकांत (दादा )पाटील

लोकहित न्यूज. पुणे. दि 4/02/2023

विधानसभेच्या कसबा आणि पिंपरी चिंचवड मतदारसंघांतील पोटनिवडणुकीसाठी भाजपाच्या पक्षनेतृत्वानं उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यानुसार हेमंत रासने कसबा विधानसभा आणि पिंपरी-चिंचवडमधील पोटनिवडणुकीसाठी श्रीमती अश्विनी लक्ष्मण जगताप यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.

भाजपच्या केंद्रीय कार्यालयाकडून पोटनिवडणुकीचे उमेदवार जाहीर केलेले पत्र

कसबा पुणे येथील भाजपच्या आमदार मुक्ताताई टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे अकाली निधन झाले . त्यामुळे ही पोटनिवडणूक होते आहे.
भाजपाचे नेते व सध्याचे विद्यमान मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनीश्री रासने वश्रीमती जगताप यांच्या विजयाची खात्री व्यक्त केली आहे. मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी स्पष्ट केले आहे की..
मला खात्री आहे की, त्यांची अपुरी राहिलेली कामं पूर्ण होण्यासाठी मतदारांकडून पुन्हा एकदा भाजपावरच विश्वास दाखवला जाईल आणि श्री. रासने आणि श्रीमती अश्विनी जगताप यांचाच पुन्हा विजय होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *