लोकहित न्यूज .विशेष वृत्त मांजरीबु. पुणे.दि.8/02/2022
कितीही जोर लावा पुणे महापालीकेत भाजपचाच महापौर बसणार राष्ट्रवादीचे स्वप्न चक्काचुर होणार ,चंद्रकांत पाटील. यांची स्पष्टोक्ती.कोणी कितीही जोर लावा ,प्रभागाची पाहीजे तशी चिरफाड करा जनता भाजपाच्या पाठीशी आहे.पाच वर्षातील कामे जनतेने पाहिली आहेत त्यामुळे पुढचा महापौर भाजपचाच होणार .आणखीन एकदा भाजपाच सत्ता काबीज करणार मांजरीबु येथिल पञकार परिषदेत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील बोलत होते.
मांजरी बु येथिल भाजपा युवा कार्यकर्ते सुमित घुले यांच्या निवासस्थानी पञकार परिषदेत पाटील यांनी पञकारासोबत संवाद साधला. या वेळी भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष माजी आमदार योगेश टिळेकर ,पश्चिम महाराष्ट्र भाजप उपाध्यक्ष जालींदर कामठे, माजी आमदार बापूसाहेब,पठारे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे, शहर संघटक सरचिटणीस राजेश पांडे , प्रदेश सदस्य रोहिदास उंद्रे,हडपसर विधानसभा अध्यक्ष संदीप दळवी, मा.जिल्हा परिषद सदस्या वंदना कोद्रे ,डाॕ दादा कोद्रे ,सरचिटणीस संदीप लोणकर, अविनाश मगर,मांजरीचे मा.सरपंच शिवराज घुले, भाजपयुवामोर्चा उपाध्यक्ष सुमित घुले, उपाध्यक्ष भूषण तुपे,सुनिल धुमाळ,बाळासाहेब घुले, पुरुषोत्तम धारवाडकर ,विशाल मस्के, गणेश घुले ,शैलेंद्र बेल्हेकर,सुभाष घुले, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शहरासह ग्रामीण तसेच पुणे महापालीकेत नव्याने समाविष्ट 23 गावात ही भाजप वाढलेली आहे .पक्षाने पाच वर्षात केलेली विविध विकास कामे ,पायाभूत सोयीसुविधा ,मेट्रोलाईन वैद्यकीय सुविधा ,पाणी योजना ,ड्रेनेज लाईन, सिमेंट काँकरीट रस्ते , पूर्णत्वास नेले तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सात वर्षातील विकास कार्य मुळे जनता भाजपला साथ देणार आहे.
राष्ट्रवादी काँ ची स्वप्न चक्काचूर होणार असून त्यांना जनता साथ देणार नाही.राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष हे हवेत बोलतात त्याला अर्थ नाही भाजपचे 90 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येतील मतदारांचा कौल आमच्या बाजूने आहे व पुढचा महापौर भाजपचाच असेल असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.