लोकहित न्यूज ,पुणे दि.27/10/2021
मुंबई वगळता राज्यातील महापालीकेतील सदस्य संख्या १५% ने वाढवण्याचा राज्यशासनाचा निर्णय
राज्यातील महापालिकांमधील सदस्यसंख्या १५ टक्केंनी वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यानुसार पुण्यात २५ नगरसेवक वाढणार आहेत.सध्या पुण्यात १६४ नगरसेवक आहेत. नव्या निर्णयाप्रमाणे नगरसेवकांची संख्या २५ ने वाढणार असून पुण्यातील एकुण नगरसेवकांची संख्या १८९ होणार आहे.
वाढलेल्या सदस्यसंख्येला अनुसरून प्रभाग रचना करावी लागणार आहे. पुण्यात तीन सदस्यांचे ६३ प्रभाग होतील. यामध्ये अनुसूचित जातींसाठी १३.४ टक्के असून त्यानुसार अनुसूचित जातींच्या प्रवर्गासाठी २५ जागा राहणार आहेत. अनुसूचित जमाची प्रवर्गासाठी १.२ टक्के आरक्षणानुसार दोन जागा मिळतील.
इतर मागास प्रवर्गासाठी ५१ टक्के आरक्षणानुसार ५१ तर खुल्या गटासाठी १११ जागा मिळतील. 111 जागांमध्ये महिलांसाठी ५० टक्के आरक्षण असल्याने सर्व गटातील महिलांसाठी ९४ जागा मिळतील.सर्वसाधारण गटातील पुरुषांना 55 जागा मिळण्याची शक्यता आहे.
मुंबई वगळता राज्यातील सर्वच महापालिकांना हा निर्णय लागू होणार आहे. या निर्णयाप्रमाणे राज्य निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचना करण्याचे काम हाती घेण्यात येईल. यानुसार पुण्यात तीन सदस्यांचे ६३ प्रभाग होतील यात शंका नाही.