अजित घुले यांनी अतिशय देखण जनसंपर्क कार्यालय निर्माण केलय याचा मांजरी परिसरातील नागरिकांच्या समस्या ,अङचणी मोठ्या ताकदीने सोडवण्यासाठी उपयोग होईल व पक्षाला फायदा होईल -जयंत पाटील.
लोकहित न्यूज ,मांजरी पुणे दि.21/09/2021
उपमुख्यमंञी अजित दादा पवार व मंञी जयंत पाटील उद्घाटन स्थळी पोहचताना चे क्षणचिञ
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस.अजित दत्तात्रय घुले यांच्या जनसंपर्क कार्यालायचे उदघाटन, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री.ना.अजित दादा पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री.ना जयंत पाटील,यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले.
यावेळी ना.अजितदादा पवार तसेच ना.जयंत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करत उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी बोलताना ना.अजितदादा पवार म्हणाले की,
“या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून लोकांची कामे मोठ्या प्रमाणात व्हावीत.आलेल्या प्रत्येक माणसाचे काम होईलंच असेल नाही,परंतु प्रत्येकाचे काम करण्याचा पूर्ण प्रयत्न मात्र करण्यात यावा.सध्या राज्यात सर्वत्र राष्ट्रवादीमय वातवरण असून त्याचा निश्चितच येणाऱ्या महापालिका निवडणुकीत पक्षाला फायदा होईल.येत्या महापालिका निवडणुकीत तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी देण्यात येईल,”असे सूतोवाच करत अजितदादा पवार यांनी,अजित दत्तात्रय घुले यांच्या संभाव्य उमेदवारीचे संकेत दिले असल्याची परिसरात चर्चा आहे.
ना.जयंत पाटील याप्रसंगी म्हणाले की,
“अजित दत्तात्रय घुले यांनी अतिशय देखणं जनसंपर्क कार्यालय उभे केले आहे.मला खात्री आहे की,मांजरी परिसरातील प्रश्न,समस्या सोडविण्यासाठी अजित घुले यांचे हे कार्यालय ताकदीने काम करेल.त्यांनी ज्या मेहनतीने हे कार्यालय उभे केले आहे ते पाहता,त्यांनी जोरदारपणे मांजरी परिसरातील नागरिकांची सेवा करण्याचे ठरवले असल्याचं दिसून येत आहे.”
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडे जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि जेष्ठ नेते श्री.शरदचंद्रजी पवार यांनी देखील धावती भेट दिली.अचानक मिळालेल्या या सुखद धक्क्यामुळे कार्यकर्त्यांची अचानक धावपळ उडाली मात्र,त्यांच्यात जोरदार उत्साह देखील संचारला.
या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी देखील मोठा प्रतिसाद दिला.कोरोनाचे नियमांचे पालन करत सदर कार्यक्रम उत्साहात पार पडला.यावेळी स्थानिक आमदार श्री.चेतन तुपे,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष श्री.सुरेश अण्णा घुले,दिलीप घुले,शिवाजीराव खलसे,कैलास घुले,जितीन कांबळे,रवींद्र गोगावले,सुधीर घुले,राहुल घुले,शंतनु जगदाळे,अमर तुपे,प्रशांत घुले,निलेश घुले,मंगेश मोरे,सागर बत्ताले,बालाजी अंकुशराव,निलेश घुले,दिलीप टकले,छाया घुले,रवी दिवाण,मेघराज घाडगेआणि परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.