मुंबई, दि. 8 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या ‘लोकराज्य’चा मार्च महिन्याचा महिला विशेषांक प्रकाशित झाला आहे. 8 मार्च या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या अंकात विविध कर्तृत्ववान महिलांची ओळख करून देणाऱ्या यशकथा, योजना आदींचा समावेश करण्यात आला आहे.

चालू घडामोडी मुंबई
Share now
Advertisement

मुंबई प्रतिनिधी

महाराष्ट्रातील आणि भारतातील महिलांच्या चळवळींच्या संदर्भात काही आत्मचिंतन व त्याचे शाश्वत विकासाशी काय नाते आहे याचा ऊहापोह करणारा विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा लेख हे या अंकाचे वैशिष्ट्य आहे. महिलांसाठी राज्य शासन राबवत असलेल्या विविध योजना व उपक्रमांची माहिती महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर व राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आपल्या मनोगतातून दिली आहे. त्याचबरोबर राज्याच्या विधिमंडळातील महिला लोकप्रतिनिधींची ओळख, विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या महिला, कोरोना काळात यशस्वी लढा देणाऱ्या महिला अधिकारी-कर्मचारी यांच्या यशकथांचा तसेच मंत्रिमंडळ निर्णयांचा समावेश या विशेषांकात करण्यात आला आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *