लोकहित प्रतिनिधी मुंबई दि.8 मार्च 2021
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर मिळाली सतरा कोटींच्या निधीला मंजुरी
मतदार संघातील तलाठ्यांना कार्यालय आणि त्या ठिकाणी त्यांचे निवासस्थान असले पाहिजे असं राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा मानस होता. त्यासाठी ते अनेक दिवसापासून प्रयत्न करीत होते. अखेर निधी मंजूर झाल्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने आणि त्यांनी दिलेला शब्द पूर्ण झाल्याने समाधान व्यक्त केले.
जनतेची होणार सुविधा.
तलाठी अनेक वेळा जागेवर नसल्यामुळे जनतेच्या कामांना विलंब होतो. त्यामुळे त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. मात्र राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून तलाठ्यांच्या कार्यालयाजवळ निवासस्थानाच्या बांधकामास मंजुरी मिळवून घेतली आहे. त्यामुळे तलाठी जागेवर उपलब्ध होतील आणि जनतेची कामे वेळेत होतील.
हा उपक्रम ठरेल मैलाचा दगड.
तलाठी कार्यालय जवळ निवासस्थान असावे असा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा मानस होता. त्यामुळे जनतेसाठी सोयीचे होईल. असा त्यांचा उद्देश आहे. त्यांच्या या उपक्रमाला मंजुरी मिळाल्याने तो उपक्रम मैलाचा दगड ठरेल आणि राज्यभरात असा उपक्रम सर्वत्र राबवला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही