Advertisement
पुणे : पुण्यातील बंड गार्डन मेट्रो स्टेशन परिसरात रविवारी पहाटे कारच्या अपघातात दोन जण ठार तर अन्य एक गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.पिंपरी-चिंचवडमधील थेरगाव येथील यशप्रसाद भंडारी (२३) आणि पुण्यातील पिंपरीगाव येथील ऋत्विक उर्फ ओम विनायक भंडारी (२३) अशी मृतांची नावे आहेत.पुणे शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे 5.30 च्या सुमारास कार बंड गार्डन मार्गावरून जात असताना ही घटना घडली.जखमी प्रवासी खुशवंत टेकवानी यांना गंभीर अवस्थेत ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.प्राथमिक तपासात टेकवानी हा बीड जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.





