पुणे : पुण्यातील बंड गार्डन मेट्रो स्थानकावर रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास कार मेट्रोच्या खांबावर आदळून झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे.पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्क पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील बंड गार्डन परिसरात ही घटना घडली.“पहाटे 4.30 च्या सुमारास एक कार बंड गार्डन मेट्रो स्टेशनच्या खांबावर आदळली. प्राथमिक माहितीनुसार, कारमधील दोघांचा मृत्यू झाला, तर तिसरा व्यक्ती गंभीर जखमी झाला,” असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संगिता जाधव यांनी सांगितले.“आम्ही मृताची ओळख पटवून घेण्याच्या प्रक्रियेत आहोत आणि हा अपघात कसा झाला याची पडताळणी करत आहोत,” असे अधिकाऱ्याने सांगितले.अपघाताच्या परिस्थितीचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
पुणे : मेट्रो स्टेशनच्या खांबावर कार आदळून दोन ठार, एक जखमी | पुणे बातम्या
Advertisement





