शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, बाळासाहेब भवन. मुंबई येथे सोमवार पासून सेनेच्या मंत्र्यांचा जनता दरबार भरणार.
नितीन जाधव.बाळासाहेब भवन, मुंबई दि 25/01/25
शिवसेना पक्ष मध्यवर्ती कार्यालय,बाळासाहेब भवन. मुंबई येथे सोमवारपासून सेनेच्या मंत्र्यांचा जनता दरबार भरणार आहे. सामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी तसेच जनतेची कामे तत्काळ व्हावीत, पक्षाच्या कार्यकर्त्यांना थेट भेटता यावे यासाठी शिवसेनेच्या मंत्र्यांचा जनता दरबार भरणार असल्याची माहिती पक्षाच्या मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली आहे. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षाचे मंत्री आठवड्यातील तीन दिवस सोमवार, मंगळवार, बुधवार, सकाळ दुपार सायंकाळ अशा तीन सत्रा मध्ये जनता दरबारासाठी उपस्थित राहणार आहेत. सदरच्या जनता दरबाराचे वेळापत्रक पक्ष कार्यालयातून जारी करण्यात आले आहे.
सोमवार उद्योग मंत्री उदय सामंत ,मंगळवार गृहराज्यमंत्री योगेश कदम, बुधवार पर्यटन मंत्री शंभूराज देसाई सकाळी ठीक 9.00 ते 11.00 या वेळेत उपस्थित असतील तसेच सोमवार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मंगळवार राज्यमंत्री आशिष जयस्वाल, बुधवार आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर ठीक 11.00 ते 2.00 या वेळेत उपस्थित असतील.
त्याचबरोबर सायंकाळच्या सत्रात
सोमवार शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे. मंगळवार सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ व जलसंधारण मंत्री संजय राठोड. बुधवार पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व रोहयो फलोत्पादन मंत्री भरत शेठ गोगावले
सायंकाळी ठीक 4.00 ते 7.00 या वेळेत उपस्थित असतील.
नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी रीतसर अर्जा द्वारे आपल्या कामाच्या विषयाचा उल्लेख करून भेट घ्यावी व म्हणणे मांडावे असे कळविण्यात आले आहे.