राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार अध्यात्मिक आघाडी जिल्हा अध्यक्ष पदी ह भ प समाधान महाराज देशमुख

चालू घडामोडी पुणे राजकीय वारकरी संप्रदाय शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक
Share now
Advertisement

 ह भ प समाधान महाराज देशमुख यांची  अध्यात्मिक आघाडी जिल्हा अध्यक्ष पदी  निवड.

लोकहित न्यूज पुणे प्रतिनिधी दि 09/09/2024

ह भ प समाधान दत्तात्रय देशमुख राहणार बाबुर्डी तालुका बारामती यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पार्टीच्या महाराष्ट्र राज्य आध्यात्मिक व वारकरी आघाडीच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ह भ प समाधान महाराज देशमुख हे माजी सैनिक असून बारामतीच्या ग्रामीण भागात कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत.

पुणे येथे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व आध्यात्मिक आघाडीचे राज्यप्रमुख ह भ प विठ्ठल महाराज मोरे यांच्या हस्ते व पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ शेवाळे यांच्या उपस्थितीत ह भ प समाधान महाराज देशमुख यांना निवडीचे पत्र देण्यात आले. जिल्हा अध्यात्मिक आघाडीत पक्षासाठी भरीव कार्य करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सदरच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *