चालू घडामोडी मंञालय मुंबई
Share now
Advertisement

पत्रकारांसाठी वार्ताहर कल्याणकारी महामंडळ निर्माण व्हावे व विधान परिषदेवर संधी बाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन

लोकहित न्यूज. मंत्रालय मुंबई दि 21/07/2022

वार्ताहर कल्याणकारी महामंडळ निर्माण करा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत मंत्रालय मुख्य संपर्कप्रमुख नितीन जाधव यांनी केली थेट मागणी.

वृत्तपत्र,वेब चॅनल,इलेक्ट्रॉनिक्स मीडिया यांना आर्थिक विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी व सदरच्या प्रसार माध्यमात काम करणाऱ्या वार्ताहर, पत्रकारांसाठी वार्ताहर कल्याणकारी महामंडळ निर्माण करण्यासंदर्भात पत्रकार संघाचे मंत्रालय मुख्य संपर्कप्रमुख नितीन जाधव यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन दिले . तसेच वृत्तपत्रातील प्रतिनिधी, वार्ताहर,बातमीदार यांना पत्रकारांचे तसेच वृत्त संस्थेचे वेगवेगळे प्रश्न सोडविण्यासाठी विधान परिषदेवर ही संधी देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने मागील दहा वर्षापासून वार्ताहर कल्याणकारी महामंडळ तसेच पत्रकारांना विधान परिषदेवर संधी देण्याबाबतचा मुद्दा उचललेला आहे.

महायुतीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी वार्ताहर कल्याणकारी महामंडळासाठी सकारात्मकता दाखवली होती, याचाच दाखला देत आज त्यांना त्याबाबत आणखी एकदा विनंती करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी नेहमीच कटिबद्ध राहिलेला आहे याची मला जाणीव आहे. आपले दोन्ही मुद्दे विषयी मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्यासंबंधीच्या सूचना आपणास कळविण्यात येतील . वार्ताहर कल्याणकारी महामंडळासाठी स्वतः सकारात्मक असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितीन जाधव यांच्याशी बोलताना सांगितले.


काल मंत्रालय मुख्य संपर्क प्रमुख नितीन जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सोबत वार्ताहर कल्याणकारी महामंडळ निर्माण व्हावे यासंबंधी चर्चा केलेली आहे. त्यास मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला दिसून आला.

मागील अनेक वर्षापासून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी शासन दरबारी त्यांच्या अनेक प्रश्न मार्गी लावत आलेला आहे. तसेच येणाऱ्या पुढील काळात पत्रकारांचे प्रश्न वृत्तपत्राचे प्रश्न वेब इलेक्ट्रॉनिक मीडियातील इतर सह कर्मचाऱ्यांचे प्रश्न व अडीअडचणी सोडविण्यासाठी वार्ताहर कल्याणकारी महामंडळ कायमस्वरूपी उपयोगी ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *