राज्यातील नगर परिषदेचा निकाल आता तीन डिसेंबरला नाही मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय..
लोकहित न्यूज.. मुंबई दि 02/12/25
निवडणूक आयोगाने ३ डिसेंबर रोजीच मतमोजणी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने आज महत्त्वाचा निकाल देताना मतमोजणी पुढे ढकलली आहे.
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी ही 21 डिसेंबर रोजी होणार आहे. कोर्टानं मतमोजणीचा निर्णय पुढे ढकलला आहे. हायकोर्टाने हा मोठा निर्णय दिल्याने टांगती तलवार आहे. उद्या मतमोजणी होणार नाही.
राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. अनेकांचं भविष्य आज मतपेटीत बंद होणार आहे. निवडणूक आयोगाने ३ डिसेंबर रोजीच मतमोजणी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने आज महत्त्वाचा निकाल देताना मतमोजणी पुढे ढकलली आहे.
दोन दिवसापूर्वी निवडणूक आयोगाने राज्यातील काही नरगपरिषदा आणि नगर पंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत, त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय न्यायालयाने दिला. निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर केल्यापासून अगदी मतदार यादीपासून प्रभागात दिलेल्या आरक्षणापर्यंत अनेक प्रकारचे घोळ समोर आले आहेत. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात वेगवेगळ्या याचिका दाखल झाल्या आहेत.तसेच सदरच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या भागांमध्ये 20 डिसेंबर पर्यंत आचारसंहिता लागू राहील. व 21 डिसेंबर रोजी राज्यातील सर्वच नगरपरिषदांचे मतमोजणी एकावेळी होईल व निकाल समोर येईल.
राज्यातील नगरपरिषदा चा निकाल आता तीन डिसेंबरला नाही- मुंबई उच्च न्यायालय
Advertisement





