लोकहित न्यूज पुणे दि.16/05/2021
खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे राजकीय,सामाजिक वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. मागील 24 दिवसापासून ते जहांगीर हाॕस्पीटल मध्ये उपचार घेत होते प्रकृतीत अचानक बिघाड झाला व सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
– राज्यसभेचे खासदार तसेच कॉंग्रेस समितीचे सचिव राजीव सातव यांचे पुण्यात सकाळी 9 वाजताच्या दरम्यान निधन झाले आहे. ते पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार घेत होते. राजीव सातव हे कोरोनातून बरे झाल्यानंतर नवीन विषाणू सायटोमेगँलो ची लागण झाली होती त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक होती. सातव यांच्या मृत्यू बाबत कॉंग्रसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी ट्वीट करून श्रद्धांजली वाहिली.
कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्तीय समजले जाणारे राजीव सातव यांना 22 एप्रिल रोजी कोरोना विषाणूची लागण झाली होती. त्यानंतर सातव म्हणाले होते की, सौम्य लक्षणे पाहिल्यानंतर मला एका चाचणीतून कळले की मला कोरोनाला संसर्ग झाल्याचे दिसून आले. अलिकडच्या काळात माझ्याशी संपर्क साधलेल्यांना मी सेफ्टी प्रोटोकॉलचे पालन करण्यास सांगितले गेले आहे. ”यानंतर, त्यांना पुण्यातील जहांगीर रुग्णालयात दाखल केले गेले जेथे ते व्हेंटिलेटरवर होते.कालच महसुलमंञी बाळासाहेब थोरात यांनी हाॕस्पीटल मध्ये जावून माहीती घेतली होती व प्रकृती स्थिर असुन लवकर बरे होतील असा विश्वास व्यक्त केला होता.
राजीव सातव हे महाराष्ट्रातील राज्यसभेचे सदस्य आहेत. यापूर्वी ते लोकसभेचे खासदार होते. 2014 च्या निवडणुकीत ते महाराष्ट्रातील हिंगोलीमधून निवडून आले होते, याशिवाय राजीव सातव हे अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे सचिव आणि गुजरात कॉंग्रेसचे प्रभारी आहेत.त्यांच्या अचानक निधनामुळे सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.