लोकहित न्यूज,संभाजीनगर
दि 09/09/2022
पत्रकारांच्या समस्यांवर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक:ना.संदीपान भुमरे
महाराष्ट्रातील पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी कार्य करणारे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या सोबत आता महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकार भक्कमपणे उभे राहिले असून लवकरच पत्रकारांच्या समस्यांवर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येईल,असे आश्वासन राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी िदले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या औरंगाबादेतील विभागीय कार्यालयात गुरुवारी ना. संदीपान भुमरे यांच्या हस्ते श्रीगणेशाची आरती करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी ना.संदीपान भुमरे यांना पत्रकारांच्या विविध समस्या सोडविण्याचे साकडे घातले. आपण सरकारमध्ये महत्वाचे घटक आहात. ग्रामीण पत्रकारांसोबत आपला कायम संपर्क असतो.त्यामुळे आपल्याला त्यांच्या समस्या माहीत आहेत. आता त्या सोडविण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा, असे आवाहन वसंत मुंडे यांनी केले.
ना.संदीपान भुमरे यांनी लगेच मुंडे यांच्या अावाहनाला प्रतिसाद देत सांगितले की, मुख्यमंत्र्यी 12 सप्टेंबरला पैठणला येणार आहेत. यावेळी मी पत्रकारांच्या मागण्यांसंदर्भात त्यांच्यासोबत चर्चा करतो व शक्य झाले तर 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी आपली बैठक आयोजित करतो आणि जर या दिवशी शक्य झाले नाही तर वर्षा बंगल्यावर बैठक आयोजित करतो आणि आपल्या समस्या सोडविण्याचा नक्कीच प्रयत्न करतो, असा शब्द शेवटी ना. भुमरे यांनी दिला.
यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ .प्रभू गोरे, संघटक विलास शिंगी, उपाध्यक्ष छब्बुराव ताके, कोषाध्यक्ष मुकेश मुंदडा, प्रसिद्धी प्रमुख मनोज पाटणी, ज्ञानेश्वर तांबे, सागर भोसले, पैठण तालुकाध्यक्ष शिवाजी गाडे, उपाध्यक्ष अनिस पटेल, ज्ञानेश्वर बावणे आदींसह पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.