लोकहित न्यूज ,मुंबई
वेगवेगळ्या समाज घटकांच्या उन्नतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या महाज्योती, सारथी व बार्टी या संस्थांसाठी प्रत्येकी 150 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास विकास महामंडळ साठी 100 कोटी एवढे अतिरिक्त भाग भांडवल उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याचबरोबर मौलाना आझाद महामंडळास 200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळात 200 कोटी रुपयांचे भागभांडवल देण्यात आले आहे. तसेच सांगली जिल्ह्यातील मिरज येथील हजरत ख्वाजा शमनामिरा दर्गा परिसराच्या विकासाकरिता पुरेसा निधी देण्यात येणार आहे अल्पसंख्यांक विभागासाठी 589 कोटीची तरतूद आहे. तसेच महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळास भाग भांडवल करिता शंभर कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळ वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळ भागभांडवल करिता 100 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करण्यात आला आहे. तसेच बहुजन विकास विभागासाठी एकूण तरतूद 3, 210 कोटी रुपयांची असणार आहे .विमुक्त जाती, भटक्या जमाती ,आदिवासी तसेच धनगर समाजाच्या वस्त्यांमधील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 250 कोटी रुपयांची तरतूद आहे .