लोकहित न्यूज पुणे . दि 6/06/23
महापुरुषांच्या जयंतीनिमित्त मांजरी बु. येथे आईसाहेब प्रतिष्ठाण व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्था आयोजित शिव-भिम फेस्टिवल मोठ्या थाटात संपन्न.
नोकरी मार्गदर्शन, लघुउद्योग प्रशिक्षण,
विविध डान्स स्पर्धा, शिव भीम गीते.
विविध क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार वितरण संपन्न.
मांजरी बुद्रुक येथील आईसाहेब प्रतिष्ठान व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर बहुजन विकास संस्थेमार्फत मागील बारा वर्षापासून महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने शिव भीम फेस्टिवल चे आयोजन करण्यात येते.
मांजरी बुद्रुक येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये तीन दिवस विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्यात बेरोजगारांना नोकरीचे मार्गदर्शन व नोकरीच्या संधी निर्माण केल्या तसेच लघु उद्योगाचे प्रशिक्षण, शिव भीम गीतांचा कार्यक्रम . सुप्त गुणांना वाव देण्यासाठी डान्स स्पर्धा पार पडल्या. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तींना राज्यस्तरीय तसेच क्षेत्रीय स्तरावरील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
शुक्रवार दि. 2/06/2023 रोजी तरुण मुलांसाठी DMD डान्स् मांजरी डान्स् ही स्पर्धा घेण्यात आली. शनिवार दि. 3/06/23 रोजी सकाळी 11 ते 03 या वेळेत के.के.घुले विद्यालयात सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी
उघुउद्योग व नोकरी साठी मार्गदर्शन शिबीर विकास रासकर व देवेंद्र रौराळे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. त्यामध्ये 40 तरुण-तरुणींनी सहभाग नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. त्यानंतर रात्री 7 ते 10 शिव-भिम गीताचा कार्यक्रम घेण्यात आला.
रविवारी दि 4/06/2023 रोजी
सामाजिक. शैक्षणिक.सांस्कृतिक.शिक्षण. उद्योग क्रीडा, क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व समाज हिताची उत्कृष्ट कामे करणाऱ्या मान्यवर व्यक्तींना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
त्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, भाजपा राज्य कार्यकारणी सदस्य, यशवंत साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन रोहिदासशेठ उंद्रे यांना मांजरी भूषण, मंत्रालयीन समाजाभिमुख पत्रकारिता व राज्य मराठी पत्रकार संघामार्फत राज्यभर क्रियाशील जनसंपर्काच्या माध्यमातून समाजसेवे चा ठसा उमटवनारे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या दौऱ्यात जनसंपर्क अधिकारी पदी राहिलेले नितीन जाधव यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले . गोरगरीबांची उत्कृष्टरित्या आरोग्यसेवा करणारे डॉ. नितीन वाघमारे यांना आदर्श डॉक्टर, मांजरी ग्रामपं.सदस्य व महिलांच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या संगिताताई घुले यांना शिवरत्न, . आंबेडकर चळवळीतील नावाजलेले नाव मिनाजताई मेमन यांना भिमरत्न, गोरगरीब वंचित घटकांकडून पैसे न घेता न्याय देणारे अॅड. महेंद्र ओव्हाळ यांना कायदारत्न, तसेच उद्योग विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे पृथ्वीराज नितनवरे व निरंजन ओव्हाळ यांना उद्योगरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
याच कार्यक्रमां मध्ये प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ३०० गरजू महिलांना साड्या, ८ विद्यार्थ्यांना सायकल वाटप, ५० विद्यार्थ्यांना वहया, ३५ जेष्ठ व विकलांग नागरिकांना पुर्ण पोशाख यांचे वाटप करण्यात आले.
या शिवभिम फेस्टिवलच्या मुख्य
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश आण्णा घुले, आरपीआयच्या संघमित्राताई गायकवाड, दलित पॅंथरचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंतभाऊ नडगम, आरपीआय चे मा. शहराध्यक्ष संजयदादा सोनवणे, राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष जितीन कांबळे, राष्ट्रवादी न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस बालाजी अंकुशराव, मांजरी बुद्रुक चे माजी उपसरपंच बापूसाहेब घुले, रविंद्र पवार,.अमोल चव्हाण, इम्तीयाज मेमन , आरपीआयचे शहर उपाध्यक्ष महादेव दंदी , कालीदास गायकवाड, राजू हिरभगत , सचिन चव्हाण हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजक आईसाहेब प्रतिष्ठाणचे ‘संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण आण्णा भोसले, अध्यक्ष बाळासाहेब भोसले, सुमित भोसले, अतिश थोरात, निखिलराजे भोसले, सिध्दांत कांबळे, अमित भोसले, . वैभव भोसले, विशाल धारवाडकर, संभाजी घुले, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कोमल भोसले यांनी केले व आभार पुजा कांबळे यांनी मानले.