पुणे नवनाथ जाधव
कोणाचेही काम असल्यास माझ्याकडे एजंटच्या मार्फत येऊ नये तसेच सामाजिक संस्थांनी काम करत असताना आपण ज्या जनतेचे काम करत आहोत या जनतेची पिळवणूक होता कामा नये याकडे लक्ष हवे. अनेक संघटना राज्यभरात काम करत असताना दलालीच्या मार्फत मोठी पिळवणूक करत असल्याचे माझ्या निदर्शनास आले असून यापुढील काळात कोणत्याही दलालाने एजंटाने माझ्या कार्यालयाकडे येण्याचा प्रयत्न करू नये. संपूर्ण जगभरात करण्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असून ज्यांचे काही कामे असतील त्यासाठी लवकरच अधिकाऱ्यांची नेमणूक करून त्यांचे प्रश्न तातडीने सोडवले जातील यासाठी पोलिस आयुक्त कार्यालयात एजंट अथवा विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी येऊ नये असे आवाहन पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी काल बोलताना व्यक्त केले यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे,प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव ,पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सुरेश उर्फ बंडू भाऊ भागवत उद्योजक विशाल सावंत, चंदर शिंदे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले की माझ्या कामाची पद्धत संपूर्ण भागातील जनतेला माहीत असून जनतेची पिळवणूक होऊ देणार नाही दलाल व एजंटांनी या कार्यालयाकडे येऊनये .असे प्रकार माझ्या निदर्शनास आल्यास त्यांची गय करणार नाही पुणे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालय हे जनतेच्या सेवेसाठी असून सर्व भागातील पोलिस यंत्रणेला देखील चांगले काम करण्यासाठी जनतेने सहकार्य करावे तसेच पोलीस दलात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मुलांना कमी व्याजदरात कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला असून काल रामकृष्ण मोरे सभागृह मध्ये याविषयी चर्चा करण्यात आली आता पिंपरी चिंचवड शहर हे संपूर्ण देशाच्या पटलावर भयमुक्त करण्याचा माझा प्रयत्न राहील पोलिसातील माणूस तुम्ही जाणून घ्या ना, जरा या या उक्तीप्रमाणे संपूर्ण पिंपरी-चिंचवड भागातील पोलिस यंत्रणेची नवी ओळख देण्याचा माझा प्रयत्न राहील जनतेची सेवा हेच आमचे ध्येय सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीद वाक्य प्रमाणे पोलीसाची सर्व यंत्रणा जनतेच्या सेवेसाठी कार्यरत राहतील असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
- महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे,राज्य प्रसिध्दी प्रमुख नवनाथ जाधव आदी पिंपरीचिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा सत्कार करताना..