जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय भूम विधीज्ञ मंडळाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध वकील ॲड. पंडित ढगे यांची बिनविरोध निवड

चालू घडामोडी मुंबई शैक्षणिक सामाजिक
Share now
Advertisement

चिंचपूर ढगे येथील शांत, संयमी.अभ्यासू वकील  ॲड.पंडित ढगे यांची अध्यक्ष पदी बिनविरोध निवड.

लोकहित न्यूज, भूम दि 22/01/259

जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय भूम येथील विधीज्ञ मंडळ निवडणूक 2025-2026 च्या निवडणुकीमध्ये  ॲड पंडित विठ्ठल ढगे यांची  अध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे.

शांत संयमी अभ्यासू व  शेतकऱ्यांना,विद्यार्थ्यांना. तरुणांना सहकार्य करणारे अभ्यासू वकील  म्हणून तालुका सह जिल्हाभरात ॲड पंडित ढगे यांची ओळख आहे..त्यांची वकील मंडळावर बिनविरोध निवड झाल्याने सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक. राजकीय वर्तुळातून त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

याशिवाय उपाध्यक्ष व सचिव पदासाठी ही निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली.

या मध्ये उपाध्यक्ष पदासाठी  ॲडअमितकुमार ॲड सुरेश मोटे तर सचिव पदासाठी .ॲड शब्बीर हबीब सय्यद यांचे एकमेव अर्ज असल्याने त्यांची यापूर्वीच बिनविरोध निवड करण्यात आली.

अध्यक्षपदासाठी .ॲड शिवाजी पवार, .ॲड शेषेराव जाधव,ॲड . अजित मोटे आणि .ॲड पंडित ढगे या चार उमेदवारांनी अर्ज भरलेले होते. परंतु वरील चार उमेदवारा पैकी .ॲड शिवाजी पवार, ॲड शेषेराव जाधव व .ॲड अजित मोटे यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतल्यामुळे .ॲड पंडित ढगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड . सिराज मोगल आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून .ॲड घनश्याम लावंड यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *