मांजरी बुद्रुक गावात इलेक्ट्रिक दूचाकी जळून खाक,आखे पार्किंगच पेटले.. इलेक्ट्रिक दुचाकी चा वापर बेभरवशा चा..
लोकहित न्यूज,मांजरी बु.. प्रतिनिधी दि 25/05/2023
मांजरी बुद्रुक गावामध्ये आज सकाळी साडेसात वाजता सुमित बाळासाहेब भोसले यांच्या टूणवाल कंपनीच्या इलेक्ट्रिक दुचाकीने पेट घेतला जळून खाक झाली त्यामुळे आखे पार्किंग पेटले व दुसऱ्या गाड्यांनी सुद्धा पेट घेतला..जीवित हानी नाही,कुटुंबातील युवकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला . भोसले
कुटुंबातील नागरिकांनी शर्ती चे प्रयत्न करत पार्किंग मधील असलेल्या दुसऱ्या दुचाकी तसेच कार यांना पेटण्यापासून वाचवले. सदरच्या घटनेमुळे भोसले कुटुंबीय पुरतेच घाबरून गेलेले असून क्षणात गाडीने पेट घेऊन दुचाकी जागेवरच भस्मसात झाल्याने त्यांचे संबंध आर्थिक नुकसान झाले आहे.
शिवाय इतरही दुचाकीने पेट घेतल्यामुळे संकटासह नुकसानीचा सामना करावा लागला या सर्व कारणांमुळे इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करावी अथवा वापर करावा का नाही असा प्रश्न निर्माण झाला असून. सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा आहे.
शासनाने जर इलेक्ट्रिक गाड्यांसाठी पुढाकार घेतलेला असला तरी त्या गाड्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह आहे अशा गाड्या नागरिकांनी वापरणे खरंच धोक्याचे झाले असल्याचे मत मांजरीतील आईसाहेब प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मण
भोसले यांनी संबंधित घडलेल्या घटनेबाबत व्यक्त केले आहे.
सदरच्या कंपनीकडूनच नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी भोसले कुटुंबीयांकडून होत आहे…