लोकहित न्यूज. मुंबई दि 11/03/2023
लोकहिताचे निर्णय घेणारे सरकार.
मुंबई ला अधिक स्वच्छ, सुंदर. खड्डेमुक्त करणार –मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबईतील पश्चिम उपनगरांमध्ये आज शिवसेना भाजपा आणि आरपीआय महायुती च्या वतीने आशीर्वाद यात्रेचे आयोजन केले होते. यात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभागी होत मुंबईकर नागरिकांशी संवाद साधला.
मुबंई त आज महायुती च्या वतीने आशीर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आले असून यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभाग घेत नागरिकांशी संवाद साधला.
सर्वसामान्य नागरिकांच्या आशीर्वादाने त्यांच्या मनातील सरकार आठ महिन्यांपूर्वी सत्तेत आणले असून या सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला न्याय देणारे लोकहिताचे निर्णय घेतले असल्याचे याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे यांनी आवर्जून सांगितले.
केंद्र सरकारच्या सहयोगाने राज्यातील डबल इंजिन सरकार जोमाने काम करत असून मुंबईला अधिक स्वच्छ आणि सुंदर शहर बनवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शहरातील स्वच्छता वाढावी यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. तसेच मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यात येणार असून त्यासाठी सर्वच रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार असल्याचे यावेळी बोलताना मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले. आगामी काळात मेट्रो प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबईतील रस्त्यांवरील वाहनांची संख्या कमी होऊन परिणामी वाहतूक कोंडीतून मुक्तता मिळेल असेही त्यांनी यात्रेदरम्यान बोलताना नमूद केले.
सदरच्या आशीर्वाद यात्रेत खासदार गजानन किर्तीकर, आमदार विद्या ठाकूर, आमदार प्रवीण दरेकर, आमदार राजहंस सिंह, आमदार अमित साटम तसेच शिवसेना भाजप आरपीआय महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मुंबईकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.