निवडणूक आयोगाकडून नाव मिळाले.
ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असे नाव देण्यात आले.
लोकहित न्यूज मुंबई दि 10/10/2022
उद्धव ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळाले आहे. तसेच एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळाले आहे. उद्धव ठाकरे गटासाठी मशाल चिन्ह प्राप्त झाले आहे तर एकनाथ शिंदे गटासाठी चिन्ह मिळावे याकरिता निवडणूक आयोगाने तीन पर्याय देण्यास सांगितले आहे अद्याप तरी शिंदे गटाला चिन्ह देण्यात आलेले नाही.
मुंबईतील अंधेरी पोटनिवडणुकीसाठी पक्षाचे नाव व चिन्ह मिळणे अतिशय महत्त्वाचे असल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने हा तातडीने निर्णय घेतलेला आहे. सदरचे चिन्ह हे पोटनिवडणुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आलेले आहे. ठाकरे गटाकडून मशाल चिन्ह प्राप्त झाल्यामुळे आनंदाचे वातावरण पसरले आहे. शिंदे गटाकडून ही बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळाल्यामुळे आनंद व्यक्त केला जात आहे. मात्र शिंदे गटासाठी चिन्ह अद्याप मिळाले नसल्यामुळे थोडीशी वाट पहावी लागणार आहे. शिंदे गटाला उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत तीन पर्याय देण्यास आयोगाने सांगितले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने तसे निर्देश दिलेले आहेत.
एकंदरीतच दोन्ही गटाकडून नावाबाबतीत तर्क वितर्क काढले जात होते त्यास पूर्णविराम मिळाला आहे. प्राप्त झालेल्या सदरच्या नावाचा येणाऱ्या निवडणुकीत दोन्ही पक्षांना किती फायदा होतो हे पाहणे औत्सुक्याचे होईल.