मांजरी बु येथे माफक दरात उच्च दर्जाचे शिक्षण मिळवून देण्यासाठी कटीबद्ध – माय छोटा स्कूल संचालक मंडळ
मांजरी म्हसोबा वस्ती येथे मातृ दिनाचे औचित्य साधत माय छोटा स्कुल प्री प्रायमरी स्कूल चे उदघाटन
सौ मीनाक्षी ज्ञानेश्वर घुले सौ अनिता घुले यांचे हस्ते उदघाटन सोहळा संपन्न.
लोकहित न्यूज मांजरी बु. दि 8/05/2022
मांजरी बु येथे मातृ दिनाचे औचित्य साधत सौ मिनाक्षी घुले व सर्व आदर्श माता यांच्या हस्ते माय छोटा स्कूल चे उदघाटन करण्यात आले. मांजरी बु परिसरातील मध्यम वर्गीय व तळागाळातील लोकांना वाजवी दरात उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे हे ध्येय मनी बाळगून प्री प्रायमरी माय छोटा स्कूल ची स्थापना केल्याचे संचालिका सौ निना कदम माने यांनी सांगितले. यावेळी संस्थेच्या संचालिका सौ योगिता मोहिते पाटील, सौ.शितल पुजारी पाटील
यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच पत्रकार नितीन जाधव,पत्रकार शिवराम कांबळे यांनी व्यासपीठावर अभ्यासपूर्ण विचार व्यक्त केले व शाळे ला शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजमाता जिजाऊ माँ साहेब, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, व सरस्वती देवी यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.तसेच प्रमुख पाहुण्यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून आदर्श मातांचा, प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला .
यावेळी कार्यक्रमासाठी परिसरातील महिला वर्ग मोठया संख्येने उपस्थित होता व साई समर्थ सोसायटीतील सर्व सभासद मंडळी यांनी गर्दी केल्याचे चित्र होते. या प्रसंगी व्यासपीठावर सौ मिनाक्षी घुले, सौ अनिता घुले,सौ लक्ष्मीबाई घुले , सौ शारदा घुले, सौ बायडाबाई घुले,पत्रकार संघाचे मंत्रालयीन मुख्य संपर्क प्रमुख नितीन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी बंडू शेळके.बाबू वाघमारे, साई समर्थ सोसायटी तील सर्वांनी मेहनत घेतली.