महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी नूतन केंद्रीय मंञी नारायण राणे यांचा दिल्लीत केला सत्कार .

चालू घडामोडी देश/विदेश
Share now
Advertisement

पञकार संघाच्या कार्याचे केंद्रीय मंञी नारायण राणे यांनी केले कौतुक .

लोकहित न्यूज ,दिल्ली दि.23/07/2021

महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी नूतन केंद्रीय मंञी नारायण राणे यांची दिल्ली येथे भेट घेऊन निवडी बद्दल शुभेच्छा दिल्या व पुष्पगुच्छ देत सत्कार केला.या वेळी राजकीय ,सामाजिक ,आर्थिक ,कोरोनाविषयक परिस्थिती वर उभयता मध्ये चर्चा झाली .तसेच वृत्तपञ व माध्यमक्षेञ कोरोना काळापासून अनेक आव्हानाला तोंड देत सामना करत असल्याचे मुंडे यांनी सांगितले ,शिवाय डिजीटल मिडीयामुळे वृत्तपञसृष्टी चे संपूर्ण चिञ बदलले असल्याचे स्पष्ट केले .याच बरोबर साप्ताहिके,लहान वृत्तपञे या संकटाचा निकराने सामना करत ऊभी असून त्यांना प्रवाहात आणण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले.

याच वेळी मंञी राणे यांनी अनेक विषया वर दिलखुलास पणे भाष्य केले व महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघ हा नेहमीच सर्व पञकारांच्या पाठीशी असल्याचे नमूद केले ,संघटनेच्या कोरोना काळातील कार्याचा गौराव केला.

आपला पञकार संघ प्रभावी असून सबंध महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील कार्य कौतुकास्पद आहे तसेच दिल्ली त सुध्दा मराठी पञकारांचा आवाज असल्यामुळे अभिमान वाटतो.

काळानुरुप पञकारांनी बदलणे आवश्यक झाले असून नवनवीन तंञज्ञान अवगत करणे आवश्यक आहे आता आॕनलाईन व वेब चा जमाना आहे तसे स्वतःला तयार करावे तथापि वृत्तपञ हा विश्वासार्हता तेचा पाया असून तो ही कायम टिकून राहणार आहे.

महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघ ग्रामीण शहरी पञकारांचे न्याय हक्काचे व्यासपीठ असून या कोरोना काळातील सबंध महाराष्ट्रातील रक्त संकलनाची मोहीम ,गरजूंना साहीत्यकीट वाटप ,आरोग्य विषयक जनजागृती अशी मोठी समाजसेवा आपल्या संघटने मार्फत झाली असल्यामुळे कौतुक वाटते.संपूर्ण मराठी पञकारांना नेहमीच आपण बळ दिले सर्वच माध्यम क्षेञातील पञकारासाठी आपली संघटना दिशादायक असल्याचे राणे यांनी सांगितले .

प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केंद्रीय मंत्री राणे यांचे सोबत दिलखुलास चर्चा केली , मंञी राणे यांनी वेळ दिला व संघटनेच्या कार्यशैली चे कौतुक केल्यामुळे सर्व पञकार सदस्यांचा प्रतिनिधी या नात्याने मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *