शर्वरी फाउंडेशन च्या वतीने हांडेवाडी येथे संविधान दिन उत्साहात साजरा

चालू घडामोडी पुणे सामाजिक सांस्कृतिक
Share now
Advertisement

शर्वरी फाउंडेशनच्या वतीने हांडेवाडी पुणे येथे संविधान दिन उत्साहात साजरा.

लोकहित न्यूज पुणे दि 28/11/25

शर्वरी फाउंडेशन च्या वतीने हांडेवाडी  मध्ये संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
सौ सुवर्णा पुंडलिक मेथे यांच्या शर्वरी फाउंडेशन च्या वतीने संविधान दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी सामूहिक संविधान, वाचन महापुरुषांना अभिवादन, प्रतिमा पूजन, मुलांची संविधान पर भाषणे, शालोपयोगी वस्तूंचे वाटप व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी राज्यघटनेचे महत्त्व व मूल्य विशद करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुंडलिक मेथे यांनी केले व फाउंडेशनच्या अध्यक्षा सुवर्णाताई मेथे यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका प्रियंका गायकवाड यांनी सूत्रसंचालन तर शिवाजी नाना हांडे यांनी शर्वरी फाउंडेशनच्या उपक्रमाबद्दल माहिती दिली. अशोक भाऊ न्हावले यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. शर्वरी फाउंडेशन च्या वतीने हांडेवाडी येथे संविधान दिन उत्साहात साजरा सदर प्रसंगी . अशोक भाऊ न्हावले मा उपसरपंच,राकेश झांबरे,शासन नियुक्त नगरसेवक, सौ कल्पनाताई हांडे,  सौ सुजाता ताई हांडे,  शिवाजी नाना हांडे, सचिन हांडे,  त्रिंबक लांडगे,  विजय निकाळजे,  रामचंद्र कुंभार, हांडेवाडी ग्रामस्थ विद्यार्थी पालक व शिक्षक वृंद उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *