सोलापुरात होणार विभागीय नाट्यसंमेलन.

चालू घडामोडी महाराष्ट्र मुंबई राजकीय
Share now
Advertisement

सोलापुरात होणाऱ्या १०० व्या नाट्यसंमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सोलापुरात 27 व 28 जानेवारीला विभागीय नाट्यसंमेलन.

नाट्यसंमेलन दिमाखात करण्याचा निर्धार

सोलापूर प्रतिनिधी दि 06/12/23

अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे सोलापुरात जानेवारीत होणाऱ्या १०० व्या नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्षपद पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वीकारले. यावेळी नाट्यसंमेलन दिमाखात करण्याचा निर्धार सोलापुरातील कलावंतांनी व्यक्त केला.

नाट्यसंमेलनाबाबत सोमवारी हॉटेल सूर्या येथे बैठक झाली. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्षपद पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वीकारावे असा आग्रह सर्व सदस्यांनी धरला. यावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वागताध्यक्षपद स्वीकारत असल्याचे जाहीर केले.

नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आ. राजेंद्र राऊत, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार राजा माने, अखिल भारतीय उपनगरीय शाखेचे अध्यक्ष तथा नाट्यपरिषद मुंबईचे कार्यकारणी सदस्य विजय दादा साळुंके, नाट्य परिषद चे सहकार्यवाह दिलीप कोरके नियमक मंडळ सदस्य सुमित फुलमामडी, विश्वनाथ आव्हाड, तेजस्विनी कदम, सोमेश्वर घाणेगावकर उपस्थित होते.

याप्रसंगी स्वागताध्यक्ष पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सोलापुरात होणारे १०० वे नाट्यसंमेलन अत्यंत दिमाखात पार पडेल. या संमेलनासाठी निधी व अन्य कशाचीही कमतरता भासू देणार नाही. जुळे सोलापूर परिसरात भव्य नाट्यगृह व्हावे अशी सोलापूरकरांची इच्छा आहे. त्यामुळे आगामी दोन वर्षांत जुळे सोलापुरात मोठे नाट्यगृह तयार होईल. याकरिता मी स्वतः पाठपुरावा करीन, असे आश्वासनही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिले.

प्रास्ताविक करताना विजय दादा साळुंके म्हणाले की नाट्य परिषदेच्या आठ शाखा मिळून विभागीय नाट्य संमेलन पार पाडणार आहोत.सोलापूरमध्ये 88 वे नाट्यसंमेलन तसेच पहिले अखिल भारतीय मराठी बालनाट्य संमेलन अविस्मरणीय झाले त्याचप्रमाणे विभागीय नाट्यसंमेलन होणार आहे. सदर नाट्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी स्वीकारावं हा एकमताने ठराव झाला. हे संमेलन चंद्रकांत दादांच्या नेतृत्वाखाली संपन्न होणार असल्यामुळे सर्वांना मनस्वी आनंद झाला आहे.

यावेळी आ. राजेंद्र राऊत, ज्येष्ठ पत्रकार राजा माने, शोभा बोल्ली यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ उद्योजक दत्ता सुरवसे, मोहन डांगरे, शहाजीभाऊ पवार, कृष्णा हिरेमठ, नरेंद्र गंभीरे,पद्माकर कुलकर्णी,शशिकांत पाटील, ज्योतिबा काटे,हरिभाऊ चौगुले, सुहास मार्डीकर,प्रशांत शिंगे,आशुतोष नाटकर, जे.जे कुलकर्णी, पी.पी कुलकर्णी,जगदीश पाटील, राजू राठी, अनिल पाटील यासह नाट्य परिषदेचे पदाधिकारी, रंगकर्मी, नाट्य रसिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रशांत बडवे यांनी मानले.


स्वागताध्यक्षांनी दिली अडीच लाखांची देणगी

१०० व्या नाट्यसंमेलनासाठी स्वागताध्यक्ष पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वतःच्या पगारातून दोन लाख ५१ हजार रुपयांची देणगी यावेळी दिली. तर आ. राजेंद्र राऊत आणि उद्योजक दत्ता सुरवसे यांनी प्रत्येकी एक लाख रुपये देणगी नाट्य संमेलनासाठी दिली.

जानेवारी सांस्कृतिक मेजवानी या विभागीय नाट्य संमेलनाच्या निमित्ताने 20 ते 26 जानेवारी या सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी मिळणार आहे 27 व 28 जानेवारी रोजी मुख्य नाट्य संमेलन व संमेलनाच्यापूर्वी 20 ते 26 जानेवारी सोलापूरच्या नाट्य परिषदेच्या आठही शाखेच्यावतीने सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सोलापूर शाखा, महानगर शाखा, यासह पंढरपूर, बार्शी मंगळवेढा, माळशिरस, सांगोला या शाखांचा सहभाग असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *