सिरम कंपनीकडून लस उपलब्ध होण्याचा मार्ग सुकर पंतप्रधान मोदी काय घोषणा करणार सबंध देशाचे लागले लक्ष
लोकहित न्यूज पुणे 28 नोव्हेंबर 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मांजरी येथील सिरम इन्स्टिट्यूटला लसीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी भेट देणार आहेत यावेळी ते सिरम इन्स्टिट्यूट येथे एक तास लसीची प्रक्रिया कशी होते या संदर्भात व्यवस्थितरीत्या चर्चा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन वाजून पन्नास मिनिटांनी पुणे एयरपोर्ट येथे दाखल होणार आहेत .त्यानंतर ते चार वाजून 15 मिनिटांनी सिरम इन्स्टिट्यूट येथील कंपनीच्या हेलिपॅडवर हेलिकॉप्टरद्वारे पोहोचणार आहेत त्यानंतर लागलीच चार वाजून पंचवीस मिनिटांनी सिरम इन्स्टिट्यूट कंपनीमध्ये लसी संदर्भातील प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी चर्चा सुरू करणार आहेत त्यांच्या स्वागतासाठी कंपनीचे सीईओ आदर पूनावाला व कंपनीचे सर्वेसर्वा सायरस पूनावाला उपस्थित असतील कोरोना रोगाच्या परिस्थितीमुळे यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे स्वागतासाठी उपस्थित नसतील .सिरम इन्स्टिट्यूट या मांजरी पुणे येथील कंपनीत लसीची वेगवेगळी उत्पादने घेतली जातात मात्र संपूर्ण जगाला वेठीस धरलेल्या कोरोना विषाणूंमुळे निर्माण झालेली भयानक परिस्थितीवर मात करण्यासाठी सिरम येथे विकसित झालेले लस ही नक्कीच गुणकारी ठरणार आहे व त्यातून देशासह संपूर्ण जगाला दिलासा मिळणार आहे लसीच्या प्रगतीचा आढावा घेताना पंतप्रधान मोदीजी संपूर्ण प्रक्रिया समजून घेणार आहेत व लसीचे वितरण देशभरात कसे करता येईल याचीही चाचपणी केली जाणार आहे. पुण्यातील मांजरी येथे सिरम कंपनीत कोरोना चा नायनाट करणारी लस उत्पादित होण्याचा मार्ग सुकर झाल्यामुळे पुण्यासह संपूर्ण देशाची मान जगभरात उंचावली जाईल .तब्बल एक तास चर्चा केल्यानंतर पंतप्रधान मोदी पाच वाजून पंचवीस मिनिटांनी कंपनीतून थेट लोहगाव विमानतळाकडे रवाना होतील व तेथून हैदराबाद येथील भारत बायोटेक या स्वदेशी लसीची निर्मिती करणाऱ्या कंपनीला भेट देतील, आज दिवसभर पंतप्रधान मोदी लस निर्मिती करणार्या तीन शहरातील वेगवेगळ्या तीन फार्मा कंपनीला भेट देणार आहेत त्यात अहमदाबाद येथिल झायडस कॕडीला ,पुणेतील सिरम,तर हैद्राबाद येथिल भारत बायोटेक चा समावेश आहे. तीन्ही कंपनीला भेटीदिल्यावर त्यातून कोणती लस प्रगतीपथावर पोहोचली आहे याचा परिपूर्ण आढावा घेतील व सबंध भारतीयासाठी लवकरच कोरोनावरील रामबाण ठरणारी समूळ नायनाट करणारी लस उपलब्ध होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे.