बार्शी त जरांगे पाटलाकडून उमेदवारी मिळाल्यास ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ माने तगडी फाईट देत विजय खेचून आणतील- मंत्रालय मुख्य संपर्कप्रमुख नितीन जाधव.
लोकहित न्यूज मुंबई विशेषवृत्त दि 24/10/24
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे कडून ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ माने यांना बार्शी त उमेदवारी मिळाल्यास तगडी फाईट देऊन विजयश्री खेचून आणतील अशी राजकीय, सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू असल्याचे राज्य मराठी पत्रकार संघाचे मंत्रालय मुख्य संपर्कप्रमुख नितीन जाधव यांनी सांगितले.
काल मध्यरात्री डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे अध्यक्ष व जेष्ठ पत्रकार राजाभाऊ माने यांनी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली येथे सरपंचाच्या मळ्यात भेट घेतली. यावेळी माने यांनी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक,पत्रकारिता क्षेत्रातील कार्याची माहिती देत विविध विषयावर चर्चा केली. तसेच राज्यभर करत असलेल्या कार्याचा अहवाल त्याच सोबत बार्शी मतदारसंघातील सध्याची परिस्थिती व राजकीय वातावरण संबंधित इथभूत चर्चा केली. राजाभाऊ माने हे पत्रकारिता क्षेत्रातील राज्यातील मोठे नाव आहे. सांस्कृतिक, साहित्य,शैक्षणिक, आरोग्य, शेती,पत्रकारिता,क्रीडा आदी क्षेत्रातील त्यांना मानणारा व चाहता वर्ग मोठा आहे.
माने यांनी दैनिक पुढारी,दैनिक लोकमत,दैनिक सकाळ,दैनिक एकमत अशा विविध अग्रगण्य दैनिकांमध्ये संपादक,समूह संपादक अशा मोठ्या पदावर काम केलेले आहे. विशेष म्हणजे लोकमत सारख्या राज्यातील सर्वात मोठ्या अग्रगण्य वृत्तपत्र संस्थेचे ते मुंबई येथे समूह संपादक राहिलेले आहेत शिवाय राजकीय विश्लेषक असल्यामुळे राज्यातील डावपेची व धूर्त राजकारणाचा त्यांचा गाढा अभ्यास आहे.
तसेच डिजिटल मीडिया संघटनेच्या माध्यमातून त्यांनी पत्रकारितेतही मोठे संघटन उभे केले आहे. उत्तम दर्जाचा राजकीय रणनीतीकार व उत्तम संभाषण कौशल्य असलेला तसेच उत्तम राजकीय विश्लेषक म्हणून त्यांनी ठसा उमटवलेला आहे.
बार्शी या मूळ गावी अनेक दशकापासून राजाभाऊ माने यांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे, प्रत्येकाच्या हाकेला धावून जाणारा संपादक, साधा सरळ स्वभावाचा माणूस , समाजातील वंचिताला गोरगरिबाला न्याय देणारा सच्चा पत्रकार. मतदार संघातील प्रत्येकाशी कोणत्या ना कोणत्या कामाच्या निमित्ताने या व्यक्तिमत्त्वाची नाळ जोडलेली आहे. असा हा दिलदार मनाचा राजाभाऊ माने जरांगे पाटील यांच्यामार्फत जर बार्शीच्या मैदानात उतरला तर तगडी फाईट देत विजयश्री खेचून आणल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची चर्चा राजकीय सामाजिक वर्तुळात पहावयास मिळत आहे.