सरकारी कामात अडथळा आमदार बच्चू कडू यांना दोन वर्षाची शिक्षा नाशिक न्यायालयाचा निकाल.

गुन्हेगारी चालू घडामोडी महाराष्ट्र मुंबई राजकीय
Share now
Advertisement

लोकहित न्यूज.नाशिक दि 08/03/2023

आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. आमदार बच्चू कडू यांना नाशिक व जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. शासकीय कामात अडथळा आणि आणि अधिकाऱ्यासोबत गैरवर्तणूक संदर्भात न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

दिव्यांग कल्याण निधी खर्च केला नाही या वादातून आमदार बच्चू कडू यांनी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला गेला होता. तसेच शिवीगाळ केली होती. यावर पोलिसांनी हस्तक्षेप करत पुढील घटना थांबवली आणि कडू यांना ताब्यात घेतले होते. सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता.यानंतर आता न्यायालयाने शासकीय कामात अडथळा आणि आणि अधिकाऱ्यासोबत गैरवर्तणूक संदर्भात न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

नाशिक महापालिका आयुक्तांवर आमदार बच्चू कडू यांनी हात उगारला होता. यानंतर आमदार बच्चू कडू यांना सरकारी अधिकाऱ्याला मारहाण करणे चांगलेच भोवले आहे. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर नाशिक न्यायालयाने आमदार बच्चू कडू यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.

याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालायात सुनावणी सुरू होती. नाशिक आयुक्तांवर हात उगारल्या प्रकरणी बच्चू कडू यांना दोन वेगवेगळ्या प्रकारणात ही दोन वर्षाची शिक्षा झाली आहे. 2017 साली नाशिक महापालिकेत अपंगांच्या मागण्यांसाठी आंदोलन सुरू होते. महापालिका आयुक्त यांना धमाकवणे आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आमदार बच्चू कडू यांच्यावर होता.

तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे आता सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी 1 तर सरकारी अधिकाऱ्याला अपमानित केल्याप्रकरणी 1 अशी 2 वर्षांची शिक्षा आमदार बच्चू कडूंना ठोठावण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *