“आम्ही भारताचे लोक…”या
संविधानाच्या सामूहिक वाचनाने संविधान दिन साजरा.
लोकहित न्यूज पुणे दि 28/11/25
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे खराडी येथील शंकरराव उरसळ कॉलेज ऑफ फार्मसी डिप्लोमा महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय लोकशाहीची पायाभरणी करणाऱ्या भारतीय संविधानाची महती अधोरेखित करण्यासाठी महाविद्यालयात संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील प्रथम आणि द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी संविधानाबद्दल आपले मनोगत व्यक्त
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अश्विनी शेवाळे या स्वतः कायद्याच्या पदवीधर असल्याने त्यांनी संविधान निर्मितीची ऐतिहासिक प्रक्रिया, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची संविधान कार म्हणून भूमिका आणि आधुनिक भारतातील संविधानाचे अपरिहार्य महत्व यावर आपले विचार मांडले.तसेच संविधानाचा अभ्यास म्हणजे समाजासाठी जबाबदारीचे जाण विकसित करणे तसेच त्यांनी संविधान मूल्यांचे रक्षण करण्याचे आवाहनही विद्यार्थ्यांना केले. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित नामांकित विधिज्ञ पुणे बार असोसिएशनचे माजी कार्यकारी सदस्य अॅड. संदेश जायभाय यांनी विद्यार्थ्यांना संविधानामध्ये दिलेल्या मूलभूत अधिकार आणि कर्तव्यांची माहिती अतिशय सोप्या भाषेत दिली.त्यांनी भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठी परिपूर्ण आणि समतोल विचारांची रचना असल्याचे सांगताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचे स्मरण केले. विभाग प्रमुख प्राध्यापिका अश्विनी बनकर यांनी संविधानाचे सामूहिक वाचन केले त्यावेळी वातावरण देशभक्ती ने भारावून गेले.
कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. शितल बोरस्ते यांनी आणि आभार प्रदर्शन परीक्षा प्रमुख प्रा. ऐश्वर्या निचळ यांनी केले.
कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.





