प्रा.जयंत आसगावकर यांच्या विजयाचे खरे शिल्पकार गृहराज्यमंञी सतेज पाटील होय करुन दाखवल..

महाराष्ट्र राजकीय
Share now
Advertisement

लोकहित न्यूज, कोल्हापूर दि.5 डिसेंबर 2020

होय आमच ठरल होत विजय खेचून आणण्याची जबाबदारी घेतली होती .

कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी ठरवलं की ते करुन दाखवतात असंच काहीसं समीकरण जिल्ह्याच्या राजकारणात तयार झालं आहे. लोकसभा निवडणुकीपासून ते जिल्हा परिषदेत झालेल्या सत्तांतरापर्यंत याचा प्रत्यय आला आहे. इतकंच नाही तर पदवीधर व शिक्षकनिवडणूकीच्या निकालानंतर ते पुन्हा अधोरेखित करुन दाखवल आहे व स्पष्ट दिसत आहे.

पदवीधर आणि आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर पुणे मतदारसंघातून शिक्षक किंवा पदवीधरपैकी एक उमेदवारी काँग्रेसला द्यावी , दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी मी घेतो, असा विश्वास त्यांनी कॉंग्रेस चे प्रभारी एच के पाटील यांना जाहीर सभेत दिला होता. त्यानंतर एक महिन्यानंतर शिक्षक मतदार संघातून प्रा.जयंत आसगावकर यांना विजयी करत ही जबाबदारी सतेज पाटील यांनी यशस्वीपणे पूर्ण केली.

विजयाची हमी घेणारा क्रियाशील संघटनप्रिय काँग्रेस नेता सतेज पाटील

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात महाराष्ट्रातील पहिला ट्रॅक्टर मोर्चा 5 नोव्हेंबरला सतेज पाटील यांच्या आयोजनातून काँग्रेसनं काढला. या मोर्चासाठी काँग्रेस प्रभारी एच.के.पाटील उपस्थित होते. यावेळी भाषणादरम्यान पालकमंत्री असलेल्या सतेज पाटील यांनी शिक्षक किंवा पदवीधर पैकी एक जागा काँग्रेसकडे घेण्याची मागणी केली.

कष्ट करुन मायक्रो प्लॕनिंग फळास लावले

सतेज पाटील यांच्या मागणीप्रमाणे ही जागा महाविकास आघाडीत काँग्रेसला मिळाली. सतेज पाटील यांनी काँग्रेसच्याच जयंत आसगावकर यांना उमेदवारी मिळवून देत, ठरवलेल नियोजन सत्यात उतरवले. यानंतर मात्र आपली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी प्रचार काळात पाचही जिल्ह्यात अक्षरशः पायाला भिंगरी लावून फिरले. आजअखेर त्यांच्या या धडपडीला यश तर आलंच, पण दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी किती कष्ट घेऊ शकतो याची झलकही त्यांनी दाखवली.

प्रचारात स्वतःला झोकून दिले आघाडी च्या नेत्यांबरोबर सुसंवाद ठेवत ताकत लावली.

उमेदवार निश्चित झाल्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील चांगलीच कंबर कसली व प्रचारात आघाडी घेतली. ही जागा कोणत्याही परिस्थिती निवडून आणणे त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचं बनलं होतं. त्यासाठी न थकता बैठका, प्रचारसभा त्यांनी पूर्ण केल्या. इतकंच नाही तर प्रत्यक्ष मतदानादिवशी सुद्धा सकाळी सात वाजल्यापासून ते मतदान संपेपर्यंत जिल्ह्याबरोबरच जिल्ह्याबाहेरील मतदान केंद्राला भेटी देऊन आढावा घेत होते. सतेज पाटील यांच्याबरोबरच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे देखील या निवडणुकीत पूर्ण ताकतीने उतरले होते. त्यामुळेच महाविकास आघाडीने पुणे शिक्षक मतदारसंघात प्रा. आसगावकर यांच्या रुपाने आमदार निवडून आणला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *