जनमाणसाला खरा न्याय मिळवून देणारे न्यायमूर्ती ,लोकप्रिय नगरसेवक कायदेतज्ञ भैय्यासाहेब जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर प्रवक्ता पदी नियुक्ती मान्यवरांकडून शुभेच्छा वर्षाव.

चालू घडामोडी महाराष्ट्र राजकीय

जनमाणसाला खरा न्याय मिळवून देणारे माजी न्यायाधीश तथा लोकप्रिय नगरसेवक अॕड भैय्यासाहेब जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस च्या शहर प्रवक्ता पदी नियुक्ती अनेक मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव

लोकहित न्यूज ,पुणे दि.09/09/2021

अनेक विषयात विद्वान ,अमोघ वक्तृत्व ,विरोधकांना ही हेवा वाटावा असा स्वभाव ,कायद्याची प्रचंड जाण असणारा वकील ,जनतेला भावणारे राहणीमान ,न्यायीक , अभ्यासू कल्पनेतून समाजाची प्रगती करणारा समाजसेवक अशा अनेक बिरुदावली ज्याच्या व्यक्तीमत्वा ला पुरेपूर शोभून दिसतात ते खराडी चंदननगर प्रभागाचे नगरसेवक म्हणजे भैय्यासाहेब जाधव. नगरसेवक भैय्यासाहेब जाधव यांची आज राष्ट्रवादी काँग्रेस कडून पुणे शहर प्रवक्ता पदी नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभेच्या वडगावशेरी मतदार संघातील महत्त्वाच्या अशा खराडी प्रभागाचे नगरसेवक म्हणून 2017 साली पहिल्या वेळेसच निर्विवादपणे जिंकून आले. ते प्रसिद्ध वकील असून जिल्हा न्यायाधीश पदी कार्य केल्याचा त्यांचा अनुभव आहे. त्यांच्या जवळ असलेल्या कायद्याच्या ज्ञानाची त्यांनी महापालीकेत ही झलक दाखवून प्रभावी पणे मांडणी करुन विरोधकांना नामोहरम केल्याची उदाहरणे आहेत ,तसेच ज्ञानाबरोबरच लाभलेले अमोघ वक्तृत्व त्यांची जमेची बाजू असून स्वतःच्या प्रभागात अनेक नवनवीन समाजउपयोगी प्रयोग राबवत असतात. राजकीय सभा सामाजिक ,सांस्कृतिक कार्यक्रम ,पक्षिय कार्यक्रम ,मनपा सभागृह आदी ठीकाणी त्यांची अभ्यासपूर्ण भाषण लोककल्याणकारी ठरलेली आहेत. राष्ट्रवादी पक्षाचे संघटन वाढीस त्याचा वेळोवेळी फायदा झाला आहे.
उपमुख्यमंञी तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या मार्गदर्शन खाली
राष्ट्रवादी काँ पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भैय्यासाहेब जाधव यांच्या सारख्या समाजप्रिय ,हरहुन्नरी,क्रियाशील नगरसेवकाची शहर प्रवक्ता पदी नियुक्ती केल्यामुळे पक्षाची ध्येय धोरणे समाजातील सर्व स्तरापर्यंत पोहचण्यासाठी मदत होईल तसेच सामान्य जनतेला खरा न्याय मिळेल असी अशा कार्यकर्ते व्यक्त करताना दिसत आहेत.पुणे शहरातील अनेक सामाजिक संघटना ,धार्मिक मंडळे ,शैक्षणिक संस्था ,नामवंत वकील ,उद्योजकीय ,राजकीय क्षेञातील मान्यवरांकडून भैय्यासाहेब यांच्या नियुक्ती बद्दल शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
लोकहित न्यूज तर्फे नगरसेवक भैय्यासाहेब जाधव यांचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा.

Share now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *