मुंबईकरांच्या सेवेत आज दि.4 डिसेंबर रोजी मुख्यमंञ्यांच्या हस्ते 26 एसी ईलेक्ट्रीक बसेस चे लोकार्पण

चालू घडामोडी मुंबई

लोकहित न्यूज, मुंबई प्रतिनिधी दि.4/12/2020

शहरातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी बेस्ट उपक्रमात टाटा मोटर्स ने उत्पादित केलेल्या पर्यावरणपूरक 26 एसी ईलेक्ट्रिक बसेस मुंबईकरांच्या सेवेत आज दाखल झाले आहेत. या बसच्या ताफ्याचे आज चार डिसेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते झेंडी दाखवून लोकार्पण करण्यात आले. यावेळी नरिमन पॉईंट येथील लोकार्पण सोहळ्यात मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर ,मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख ,पर्यावरण मंत्री आदीत्य ठाकरे ,खासदार अरविंद सावंत, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, बेस्टचे महाव्यवस्थापक डॉक्टर सुरेंद्र कुमार बागडे उपस्थित होते.

Share now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *